Pune Crime: Web Series पाहून पतीची हत्या, अल्पवयीन मुलीच्या प्रेमास विरोध केल्याने पत्नीकडून टोकाचे पाऊल, सर्व आरोपींना अटक

त्यातून प्रेरणा घेत आणि हत्येचे विविध प्रकार शोधून हे कृत्य केले. पुणे ग्रामीण पोलिसांनी एक आठवड्याच्या आत या फिल्मी स्टाईल हत्या प्रकरणाचा उलघडा केला. या प्रकरणात अल्पवयीन मुलगी आणि इतर तिन्ही आरोपींना ताब्यात घेततले आहे

Kill | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Crime Web Series: पुणे (Pune ) येथून एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रेमास विरोध केला म्हणून एका महिलेने मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने स्वत:च्याच नवऱ्याची हत्या केली आहे. जॉन्सन कॅजिटन लोबो (वय ४९, रा. वडगाव शेरी) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) वडगाव शेरी परिरसारत घडला. धक्कादायक म्हणजे आरोपींनी हत्या करण्यासाठी चक्का क्राईम वेबसीरीस पाहिल्या. त्यातून प्रेरणा घेत आणि हत्येचे विविध प्रकार शोधून हे कृत्य केले. पुणे ग्रामीण पोलिसांनी एक आठवड्याच्या आत या फिल्मी स्टाईल हत्या प्रकरणाचा उलघडा केला. या प्रकरणात अल्पवयीन मुलगी आणि इतर तिन्ही आरोपींना ताब्यात घेततले आहे. अग्नेल जॉय कसबे (वय २३, रा. साईकृपा सोसायटी, वडगाव शेरी), सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय ४३, गुडविल वृंदावन सोसायटी, वडगाव शेरी) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाबद्दल माहिती देताना गोयल यांनी सांगितले की, आरोपी अग्नेल आणि आई सँन्ड्रा आणि वडील जॉन्सन यांची अल्पवयीन मुलगी यांच्यात पाठिमागील काही दिवसांपासून प्रेमसंबंध आहेत. सॅन्ड्रा ही अल्पवयीन आहे. त्यामुळे या प्रेम प्रकरणाला वडील जॉन्सन यांचा विरोध होता. मात्र आई सँड्रा हिचा मात्र अग्नेल आणि आपल्या मुलीच्या प्रेमप्रकरणाला पाठिंपा होता. यातून सँन्ड्रा आणि जॉन्सन यांच्यात नेहमीच कडाक्याची भांडणे होत. त्यातूनच सँड्रा हिने पती जॉन्सन याची हत्या करण्याचा कट आपली अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकरामार्फत रचला. (हेही वाचा, Bihar: '3 इडियट्स' चित्रपटाप्रमाणे नर्सने डॉक्टरसोबत व्हिडिओ कॉलद्वारे केली गर्भवती महिलेची शस्त्रक्रिया; नर्सने कापली नस, जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू)

जॉन्सन कॅजिटन लोबो याच्या हत्येचा कट मायलेकींनी प्रियकराच्या मदतीने रचल्यावर त्यांनी अनेक क्राईम वेबसीरिज पाहिल्या. त्यानंतर 30 मेच्या रात्री जॉन्सन कॅजिटन लोबो घरात झोपले असताना या तिघांनी मिळून (पत्नी सँट्रा, अल्पवयीन मुलगी आणि तिचा प्रियकर) त्याच्या डोक्यात वरंवटा घातला आणि मानेवर सुऱ्याने भोसकले. यात जॉन्सन कॅजिटन लोबो याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर या तिघांनी मृतदेह पुढचा एक दिवस घरातच ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतदेह कारमधून नगर रस्त्यावरील सणसवाडी परिसरातील मोकळ्या जागेत नेला आणि पेट्रोल टाकून जाळला.

पोलिसांना अर्धवट जाळालेल्या मृतदेहाबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. दुसऱ्या बाजूला सॅन्ड्रा जॉन्सन लोबो आणि तिची अल्पवयीन मुलगी अत्यंत साधेपणाने राहात होती. धक्कादायक म्हणजे कोणालाही संशय येऊ नये यासाठी आरोपींनी मायकेल याचा फोन सुरु ठेवला होता. त्याच्या वाढदिवस होता तेव्हा तर तिने त्याच्या मोबाईलवर स्टेटसही ठेवला होता आणि अनेकांनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसादही दिला होता. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आणि प्राप्त माहितीच्या आधारे तपास केला आणि आरोपींना अटक केली. या प्रकाराची पुण्यात जोरदार चर्चा सुरु आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif