Pune: CA कडून 1 लाखांची मागणी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; पहा काय आहे संपूर्ण प्रकरण

पौड स्थित एका व्यक्तीने चार्टर्ड अकाउंटेंटकडे 1 लाख रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास त्याच्याविरुद्ध आत्महत्येस भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

Representational Image (Photo Credit: ANI)

पुण्यातील (Pune) पौड (Paud) येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पौड स्थित एका व्यक्तीने चार्टर्ड अकाउंटेंटकडे (Chartered Accountant) 1 लाख रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास आत्महत्येस भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे त्याने म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, एका लँड डिलरचे या सीए (CA) सोबत व्यावसायिक संबंध होते. त्या लँड डिलरने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या नातेवाईकाने सीएच्या छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप केला. हा आरोप दडपण्यासाठी 1 लाखांची मागणी तो सातत्याने सीएकडे करत होता.

यासंबंधित चार्टर्ड अकाउंटेंटने कोथरुड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. FIR मध्ये दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या आरोपाचे प्रकरण दडपण्यासाठी मला पैसे द्यावेत अथवा तुमच्या विरुद्ध पौड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जाईल, अशी मागणी लँड डिलरच्या नातेवाईकाने केली होती. याप्रकरणी लँड डिलरच्या नातेवाईकाविरुद्ध खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल झाला असून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाची अधिक तपासणी करत आहेत. (चंद्रपूर मध्ये 30 लाखांच्या खंडणीसाठी अपहरणकर्त्याने अभियंत्याची जिवंत जाळून केली हत्या)

लँड डिलरच्या नातेवाईकाने 24 मार्चपासून अनेक वेळा सीएला फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. वारंवार येणाऱ्या फोन कॉल्सला कंटाळून सीएने त्याला प्रत्यक्षात भेटण्याचा निर्णय घेतला. त्या भेटीदरम्यान लँड डिलरच्या नातेवाईकाने सीएकडून पैशांची मागणी केली. दरम्यान, लँड डिलरच्या नातेवाईकाने सीएवर केलेल्या आरोपांची देखील पोलिस चौकशी करत आहेत. त्यासाठी लँड डिलरच्या अपघाती मृत्यूशी निगडीत सर्व कागदपत्रे पौड पोलिसांकडून मागवण्यात आली आहेत.