पुणे लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: जाणून घ्या महाराष्ट्रातील या जागेहून कोण होतंय खासदार? काँग्रेसचे मोहन जोशी आणि भाजपचे गिरीश बापट यांच्यात आहे टक्कर
या वेळी मतदार आपला कौल कोणाच्या बाजूने देणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
Pune Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मोहन जोशी (Mohan Joshi), भाजप उमेदवार गिरीश बापट आणि बहुजन वंचित आघाडी उमेदवार (Vanchit Bahujan Aghadi) अनिल जाधव (Anil Jadhav) यांच्यात लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे.
जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स
पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी चर्चेत आला तो काँग्रेस (Congress)पक्षाच्या निर्णय दिरंगाईमुळे. लोकसभा निडवणुकीसाठी भाजपने उमेदवार म्हणून गिरीष बापट (Girish Bapat) यांचे नाव जाहीर केलेही आणि गिरीष बापट यांन प्रचाराला सुरुवात केलीही. तरीसुद्धा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीचा घोळ आणि गुंता सुटत नव्हता. अखेर काँग्रेसच्या पुणेकर कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या नावाची वाट न पाहता हाताचा पंजा या पक्ष निवडणुक चिन्हावर प्रचार सुरुही केला. अखेर होय-नाही करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिल्लीश्वरांच्या आदेशाने माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) यांच्या नावे उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता हा सामना गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी असा आहे. बहुजन वंचित आघाडी उमेदवार (Vanchit Bahujan Aghadi) अनिल जाधव (Anil Jadhav) हेही या वेळी रिंगणात आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, 2014 मध्ये आलेल्या काँग्रेस विरोधी लाटेत या किल्ल्याला भाजपने भगदाड पाडले आणि अनिल शिरोळे यांच्या रुपाने भाजप उमेदवार विजयी झाला. या वेळी (2014) ही लढत काँग्रेस उमेदवार विश्वजित कदम विरुद्ध अनिल शिरोळे अशी झाली. आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष वारे आणि मनसे उमेदवरा दीपक पायगुडे यांनीही या लढतीत रंग भरला. अनिल शिरोळे, विश्वजित कदम, दीपक पायगुडे, सुभाष वारे यांना अनुक्रमे 5 लाख 69 हजार 825, 2 लाख 54 हजार 56, 93 हजार 502, 28 हजार 657 इतकी मते मिळाली.
पुणे लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ
- वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघ
- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
- कोथरूड विधानसभा मतदारसंघ
- पर्वती विधानसभा मतदारसंघ
- पुणे छावणी विधानसभा मतदारसंघ
- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ
दरम्यान, या वेळी लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजप तिकीटावर गिरीश बापट, काँग्रेस तिकीटावर मोहन जोशी तर, वंचित बहुजन आघाडी तिकीटावर अनिल जाधव निवडणूक रिंगणात आहेत. या वेळी मतदार आपला कौल कोणाच्या बाजूने देणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.