Pune Jeweller Receives Threat: पुण्याच्या ज्वेलर्सला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी; 10 कोटींची खंडणी मागितली, चौकशी सुरू

पोलिसांनी सांगितले की, ज्वेलर्सला ईमेलद्वारे धमकी मिळाली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Lawrence Bishnoi (फोटो सौजन्य - X/@sumitjaiswal02)

Pune Jeweller Receives Threat: लॉरेन्स बिश्नोई टोळी (Lawrence Bishnoi Gang) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (NCP leader Baba Siddique) यांच्या निर्घृण हत्येतील संभाव्य संबंधाचा महाराष्ट्र पोलीस तपास करत आहेत. या गटाशी संबंध असल्याचा दावा करणाऱ्या संशयितांना पोलिसांनी अटकही केली आहे. मात्र, आता पुण्यातील एका प्रतिष्ठित ज्वेलर्स (Pune Jeweller)ला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी देण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रसिद्ध ज्वेलरी शॉपचे मालक असलेल्या व्यावसायिकाला बिश्नोई टोळीने धमकावून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. पोलिसांनी सांगितले की, ज्वेलर्सला ईमेलद्वारे धमकी मिळाली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडित व्यावसायिकाच्या तक्रारीच्या आधारे नोंदवलेला गुन्हा सायबर विभागाद्वारे हाताळला जात आहे. व्यावसायिकाला देण्यात आलेली धमकी बिश्नोई टोळीशी संबंध आहे की, नाही? याचा तपास पोलिस करत आहेत. (हेही वाचा -Salman Khan Threat Updates: अभिनेता सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी; मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा मेसेज)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने स्विकारली. बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईत गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हाय-प्रोफाइल हत्येतील बिश्नोई हा प्रमुख संशयित असून त्याच्या कुख्यात गुन्हेगारी रेकॉर्डमध्ये आता आणखी भर पडली आहे. (हेही वाचा -Salman Khan Buys New Bulletproof SUV: लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांनंतर सलमान खानने आपल्या सुरक्षेसाठी खर्च केले करोडो रुपये; दुबईहून खरेदी केली नवीन बुलेटप्रूफ कार)

लॉरेन्स बिश्नोई टोळीने बॉलीवूड स्टार सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचीही जबाबदारी स्विकारली होती. यापूर्वी गँगस्टर गोल्डी ब्रारने पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येसाठी बिश्नोई टोळीला जबाबदार धरले होते. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बिश्नोईची टोळीचे केवळ सलमान खान लक्ष नसून त्यांनी आपली पोहोच वाढवली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) संकलित केलेल्या हिटलिस्टमध्ये बॉलीवूड अभिनेते, कलाकार, राजकारणी आणि इतर अनेकांचा समावेश असल्याचे मीडिया अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद आहेत.