Pune Serial Bomb Blasts Plot: पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इसिस दहशतवाद्यांचा कट, सिरीयामधून मिळाल्या होत्या सूचना

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध होता.

NIA | (Photo Credits: Twitte/ANI)

पुणे (Pune) इसिस (ISIS) मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) नुकत्याच पकडलेल्या दहशतवाद्याकडून तपासात अनेक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. दहशतवाद्यांना सिरीयामधून त्यासंदर्भात सूचना मिळत होत्या. पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात ही आठवी अटक आहे. दहशतवाद्यांना अटक करून ‘इस्लामिक स्टेट’चे (IS) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात यश मिळाले आहे.  (हेही वाचा - Chairman of Siddhivinayak Temple Trust Mumbai: सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी आता आमदार सदा सरवणकर!)

पुण्यात मोहम्मद शाहनवाझ आलमला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध होता. पुण्यातील कोथरूड परिसरात 19 जुलै 2023 रोजी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी पकडले होते. यावेळी शहानवाझ कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता.

‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबंधित मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय 24 वर्षे), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दोन दहशतवाद्यांचा दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा डाव होता, असे ‘एनआयए‘च्या तपासात आढळलं आहे. हे दोघं 15 महिन्यापासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचं साहित्य जप्त केलं आहे. यात शहरातील संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण केल्याचंदेखील समोर आलं आहे.