Pune Heavy Rain and Waterlogging Video: मुसळधार पावसाने पुण्यात पाणीच पाणी; पुणेकरांची दैना, पाहा व्हिडिओ
पावसामुळे पुण्यात साचलेले पाणी (Pune Waterlogging Video), त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
परतीच्या पावसाने पुण्यात दमदार हजेरी (Pune Heavy Rain Video) लावल्याने पुणेकरांची दैना उडत आहे. पावसामुळे पुण्यात साचलेले पाणी (Pune Waterlogging Video), त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. नेटिझन्सने #Punerains वापरून जलमय शहराचे फोटो आणि व्हिडिओ (Pune Heavy Rain and Waterlogging Video) शेअर केले आहेत. हे व्हिडिओ पाहता पुण्यात कशा पद्धतीने वरुनराजाने आपले रौद्ररुप दाखवले आहे याचि प्रचिती येते. इथे आपण पुण्यातील काही व्हिडिओ पाहू शकता.
रत्यांवर पाणीच पाणी
रात्री उशीर पर्यंत मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे दुचाकी, ऑटोरिक्षा यांसारख्या छोट्या वाहनांना रस्त्यावरुन वाट काढताना अडचणींचा सामना करावा लागत होता. रात्रीच्या वेळचा असाच एक व्हिडिओ @PSamratSakal या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. (हेही वाचा, Heavy Rains In Pune: पुण्यात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी झाडे पडली; अग्निशमन दल सक्रीय, अडकलेल्या 12 जणांची सुटका)
ट्विट
पाण्यातून दुचाकी खेचणाऱ्या व्यक्ती
पुण्यात मुसळधार पावसात दुचाकी वाचवण्याचा प्रयत्न करतानाचा दोन जणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @News18lokmat या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत आपण पाहू शकता की, दोन व्यक्ती आपली स्कूटर वाहून जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, शहरात मुसळधार पावसानंतर पाण्याचा जोर एवढा होता की, पाण्याच्या प्रवाहासोबत च्यांची स्कुटर ओढली जाताना दिसत आहे.
कर्वे रोडवरसुद्धा पाणी
पुण्यातील कर्वे रोड परिसरात पाणीच पाणी साचल्याचे दिसते. हा व्हिडिओ @mumbaitak या ट्विटर हँडलने शेअर केला आहे.
ट्विट
दगडूशेठ हलवाई मंदिरात पाणी
दरम्यान, पुण्यातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही पावसाचे पाणी घुसले आहे. @SakalMediaNews ने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
ट्विट
दरम्यान, पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही पुण्यात मुसळधार पाऊस पडल्याचे म्हटले आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरुन माहिती देताना म्हटले आहे की, रात्री 11.30 पर्यंत 81मिलीमीटर पाऊस! पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात सध्या ९ ते ११ किमी उंचीचे ढग सक्रिय आहेत, अशी माहिती सतर्क संस्थेकडून देण्यात आली असून मोठ्या पावसाचे क्षेत्र पुण्याच्या उत्तर- वायव्येकडे सरकत आहे. तर रात्री 11.30 पर्यंत 81 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.''
ट्विट
पावसामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तर अनेक ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. प्रामुख्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनांचे मोठे नुकसान जाले आहेत. दुचाकीवर झाड पडून एक जण जखमी झाल्याचा अपवाद वगळता कोणतीही जीवित हानी झाल्याची घटना घडल्याची माहिती नाही.
ट्विट
दरम्यान, काही नागरिक मुसळधार पावसात अडकून पडले होते. त्यांची सुटका अग्निशमन दलाने वेळीच केली आहे. सुटका केलेल्यांची संख्या 12 असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. रस्ते आणि काही इमारतींमध्येही पाणी साचले.