Pune Gang Rape: पुणे येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; सहा जण पोलिसांच्या ताब्यात

पुणे येथील चतु:श्रृंगी पोलीस (Chaturshringi Police Station) स्टेशनमध्ये पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी चाकुचा धाक दाखवून पीडितेसोबत हे कृत्य केल्याची माहिती आहे. ही घटना 23 डिसेंबर 2022 रोजी घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे पुणे (Pune Gang Rape) हादरले आहे. पुणे येथील चतु:श्रृंगी पोलीस (Chaturshringi Police Station) स्टेशनमध्ये पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी चाकुचा धाक दाखवून पीडितेसोबत हे कृत्य केल्याची माहिती आहे. ही घटना 23 डिसेंबर 2022 रोजी घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपीचा शोध सुरु आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. घडल्या घटनेमुळे पुण्यात (Pune) खळबळ उडाली आहे. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये अशी घटना घडल्याने शहरात महिला सुरक्षीत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

पोलिसांनी सदर घटनेबाबत सांगताना म्हटले की, आरोपींनी पीडितेला गाठले. आरोपींपैकी एकाने चाकुचा धाक दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पीडितेचे आक्षेपार्ह स्थितीत फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत इतर आरोपींनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घडल्या घटनेची कुठे वाच्यता केली तर आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. (हेही वाचा, Gang Rape in Palghar: सोळा वर्षीय मुलीवर 11 जणांकडून सामूहिक बलात्कार; 8 जणांना अटक, पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील घटना)

दरम्यान, पीडितेने घरी जाऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन गाठले. पीडितेच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन तपासास सुरुवात केली. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif