Pune Ganeshotsav 2022: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

त्यामुळे पुणे पोलिसांनी वाहतूक सेवेत बदल केला असून गर्दीचे केंद्रीकरण होणार नाही यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरात उद्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

Traffic | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Pune Ganeshotsav 2022: गणेशोत्सवादरम्यान नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे पोलीस सतर्क झाले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांनी वाहतूक सेवेत बदल केला असून गर्दीचे केंद्रीकरण होणार नाही यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरात उद्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. प्रामुख्याने शहरातील महत्त्वाचा म्हणून ओळखला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. इतरही काही ठिकाणावरील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक गुन्हे शाखेचे उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. जाणून घ्या पुणे शहरातील वाहतूक बदल.

शिवाजी रस्ता बंद असल्याने पर्यायी वाहतूक

नागरिकांनी वाहनातून प्रवास करताना गाडगीळ पुतळा चौकातून कुंभार वेस, शाहीर अमर शेख चौकामार्ग निवडावा

स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांनी वाहने मॉडर्न कॅफे चौकातून जंगली महाराज रोडवरुन किंवा टिळक रोड वापर करत हाकावीत

वाहतुकीसाठी खुले रस्ते

फडके हौद चौक, जिजामाता चौक, फुटका बुरुज चौक आदी रस्ते वाहतूकीसाठी खुले

आप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, मोती चौक, सौन्या मारोती चौक, बेलबाग चौक, सेवा सदन चौक, मंगला चित्रपटगृह हे मार्गही वाहतुकीसाठी खुले

बससेवेसाठी वेगळा मार्ग

पीएमपीएल बससेवेसाठी वेगळे आणि पर्यायी मार्ग असतील. त्यामुळे ज्या महिला अथर्व पठण करण्यासाठी येतील त्यांना वाहतुकीची अडचण फारशी जाणवणार नाही, असे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.

दरम्यान, गणपती उत्सवादरम्यान शहरात उत्साहाचे वातावरण असलयाने गणेशचतुर्थीपासून पुढचे पाच दिवस पुण्यात दारुविक्री बंद राहील.शिवाय कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठीही पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. जर कोणी बेकायदेशीर दारुविक्री करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.