Pune Ganapati Visarjan Dispute: पुण्यात लक्ष्मी रोड वर मानाच्या गणपतींआधी छोट्या मंडळांना विसर्जनाची परवानगी मिळणार का? Bombay High Court मध्ये आज सुनावणी
1894 साली लोकमान्य टिळकांनी पहिलं विसर्जन कुणी करावं? या वादाचं समाधान करताना गणपती विसर्जनाचा पहिला मान कसबा गणपतीला, पुण्याची ग्रामदेवता म्हणून दुसरा मान तांबडी जोगेश्वरीला, तिसरा मान गुरुजी तालीम, चौथा मान तुळशीबाग आणि पाचवा मान केसरीवाडा गणेश मंडळांना दिला आहे.
पुण्यामध्ये परंपरेनुसार लक्ष्मी रोड (Laxmi Road) वर प्रथम मानाचे गणपती आणि नंतर अन्य गणपती विसर्जनाला (Ganesh Visarjan) मार्गस्थ होतात पण आता या प्रथे विरूद्ध आता कोर्टात दाद मागण्यात आली आहे. 'बढाई समाज ट्रस्ट'चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात याबाबत दाद मागितली आहे. दरम्यान याबाबत आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. शैलेश बढाई यांच्या दाव्यानुसार मानाच्या 5 गणपतींनंतर इतरांना रस्ता खुला करणं हे संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे.
पुण्यात अनंत चतुर्दशी दिवशी लक्ष्मी रोड वर बाप्पाची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी असते. आकर्षक रथांमधून बाप्पा आपल्या गावी जायला निघतात. अशामध्ये पहिले पाच मानाचे गणपती सकाळी दहा वाजल्यापासून बाहेर पडतात. त्यांचे विसर्जन होण्यासाठी दिवस जातो. नंतर इतर गणपतींना आपला बाप्पा रस्त्यावर आणावा लागतो. यामुळे अनेक भक्तांना, मंडळांना ताटकळत उभं रहावं लागतं. नक्की वाचा: Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir Pune: गणेश चतुर्थीला यंदा 2 वर्षांनी पुन्हा दिमाखदार अंदाजामध्ये निघाली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक (Watch Video) .
आता शैलेश बढाई यांनी मानाच्या गणपतीआधी पुण्यात लहान-मोठ्या गणपती मंडळांना विसर्जन मिरवणुकांची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
1894 साली लोकमान्य टिळकांनी पहिलं विसर्जन कुणी करावं? या वादाचं समाधान करताना गणपती विसर्जनाचा पहिला मान कसबा गणपतीला, पुण्याची ग्रामदेवता म्हणून दुसरा मान तांबडी जोगेश्वरीला, तिसरा मान गुरुजी तालीम, चौथा मान तुळशीबाग आणि पाचवा मान केसरीवाडा गणेश मंडळांना दिला आहे.