पुणे: साडी सेंटरला लागलेल्या भीषण आगीत 5 कामगारांचा मृत्यू
पुणे (Pune) येथील ऊरळी देवाची मधील एका साडी सेंटरला भीषण आग लागल्याची घटना आज (9 मे) पहाटे घडली आहे.
पुणे (Pune) येथील ऊरळी देवाची मधील एका साडी सेंटरला भीषण आग लागल्याची घटना आज (9 मे) पहाटे घडली आहे. या दुर्घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
परंतु आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही.(Mumbai Fire: अंधेरी येथील इमारतीमध्ये सिलेंडर ब्लास्ट मुळे भडकली आग, 2 जखमी)
तर आता पर्यंत एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. मात्र भीषण आगीप्रकरणी अधिक माहिती देण्यात आलेली नाही आहे.