पुणे: PUBG खेळावरुन वाद झाल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला

या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Pubg Addiction | (Photo credit: archived, edited, symbolic images)

सध्या तरुणाईमध्ये पबजी गेम हा फार मोठ्या प्रमाणत खेळला जातो. मात्र पबजी गेममुळे अनेक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता पुणे (Pune) येथे पबजी खेळावरुन वाद झाल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घडना घडली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुनील माने असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. खेळासाठी मोबाईल मागितल्यावर सुनीलचे मित्रासोबत भांडण झाले. या दोघांमधील वाद ऐवढा विकोपाला गेला की सुनील याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.(अनेकांच्या मृत्यूस, घटस्फोटास जबाबदार असलेला PUBG Game ठरला जगात सर्वाधिक कमाई करणारा गेम; जाणून घ्या किती कोटी कमावले)

मात्र स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली. तर जखमी झालेल्या सुनीलला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने सुनील हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत  आहे. तर काही दिवसांपूर्वी पबजी गेमच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्यची घटना घडली होती.