Pune Crime: सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून जावयाने आयुष्य संपवलं
या त्रासामुळे रियाज नैराश्यात होता. नैराश्यातून त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यामधून समोर आली आहे. तील वाघोली परिसरात ही घटना घडली आहे. रियाज मुल्ला असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्याच्या आईने सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरुद्ध लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Bengaluru Rape Case: पार्टीवरून उशीरा घरी परतणाऱ्या तरुणीवर बलात्कार; लिफ्ट देणाऱ्या दुचाकीस्वारानेच केले दुष्कृत्य)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली. रियाज याचा सुफी शेखशी विवाह झाला होता. विवाहानंतर किरकोळ कारणावरुन रियाजला त्याच्या सासरकडून अनेक वेळा अपमानास्पद वागणूक देऊन त्याला त्रास देण्यात येत होता. या त्रासामुळे रियाज नैराश्यात होता. नैराश्यातून त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी रियाजचे सासरे मुजीब बाबू शेख, सासू शाहीन, आजे सासरे चाँद मौला शेख, पत्नी सुफी, मेहुणी सना उस्मान शेख, मेहरुन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन याबाबतचा अधिक तपास करत आहे. पुणे शहरातील वाघोली परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.