Pune Crime: नात्याला काळीमा! अल्पवयीन कर्णबधिर बहिणीवर नराधम भावाने आणि मित्रांनी केला बलात्कार, पुणे शहर हादरलं
भाऊ आणि त्याच्या मित्रांकडून अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करण्यात आला आहे.
Pune Crime: भाऊ बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. भाऊ आणि त्याच्या मित्रांकडून अल्पवयीन बहिणीवर बलात्कार (Rape) करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे कर्णबधिर बहिणीवर बलात्कार केल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. मुलगी कर्णबधिर शाळेत शिक्षण घेत आहे, शाळेतील शिक्षकाकडे या संदर्भात माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडला आहे. तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. (हेही वाचा- लिव्ह-इन पार्टनरची हत्या, सात राज्यांमध्ये शोध मोहिम राबवत दिल्ली पोलिसांकडून आरोपीला अटक)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 2018 पासून सुरु होता. या प्रकरणी पीडितेच्या भावावर आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात बलात्कार, पॉक्सो, विनयभंग अंरर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्णबधिर मुलगी एका कर्णबधिर शाळेत शिक्षण घेत आहे. या प्रकरणी तिनं शिक्षकाला माहिती दिली. शाळेच्या शिक्षकाने फिर्याद दिली. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला. पीडित मुलीच्या भावाने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तीच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तर दोघांनी तीला लग्नाचं आमिष दाखवून आणि घरात शिरून जबरदस्तीने बलात्कार केला. सागर रजाने आणि राहुल पाटील अशी दोन आरोपींची नावे समोर आली आहे. या घटनेनंतर पुण्यात संपात व्यक्त केला जात आहे.
पीडित मुलीची आई धुणी भांडीची कामे करते आणि तिच्या वडिलांचे पूर्वीचे निधन झाल्याने पीडित घरी एकटी असते. पीडितेच्या मोबईल मध्ये मैत्रिणींनी भावाच्या मित्रांचे काही फोटो पाहिले होते ही घटना शिक्षकांना सांगितली त्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पर्यंत गेले. हे प्रकरण शिक्षकांनी मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार केले.