Pune Crime: पुण्यात पुन्हा कोयता वार, पत्नीशी अनैतिक संबंधांच्या कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला
एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्यामुळे विवाहित महिलेच्या पतीने तरुणाला कोयत्याने वरा केला आहे.
Pune Crime: पुणात (Pune) कोयता वार काही संपेना.गेल्याच महिन्यात पुण्यात एमपीएससीचा (MPSC) अभ्यास करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने हल्या केल्याचे घटना घडली. हे प्रकरण शांत होताच १७ जुलै सोमवरी संध्याकाळी पुण्यातील हडपसर येथे एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचे उघडकीस आले. या हल्ल्यात तरुणाला गंभीर जखमा झाल्या आहेत. एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्यामुळे विवाहित महिलेच्या पतीने तरुणाला कोयत्याने वारा केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. पुण्यातील या घटनेमुळे परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे.
सुशांत बाळासाहेब चव्हाण (वय २६) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. हडपसर येथील रहीवासी आहेय तर अमोल संदीपान गायकवाड (वय ३४, ), मयूर चव्हाण (रा. बीड) या दोघा आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पत्नीचे नातेसंबंध कुण्या दुसऱ्यासोबत आहे याचा राग अमोलला आला आणि त्याने सुशांतला मारण्याचा कट रचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतने अमोलच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले होते. दोघेही साधारण दीड वर्षांपूर्वी पुण्यात पळून आले होते. ते हडपसर येथील ससाणेनगर भागात एकत्र राहत होते. सुशांत हा व्हिडिओ पार्लरमध्ये काम करतो अशी माहिती अमोलला याची माहिती मिळातच बड्या चालाकीने अमोल आणि त्याचा मित्र पार्लरमध्ये घुसले. अमोल आणि त्याच्या मित्राने तोंडाला रुमाल बांधला होता. यावेळी अमोलने त्याच्या जवळील कोयता काढून त्यावर सुशांतवर हल्ला केला. सुंशात रक्तबंबाळ झाला आणि गंभीर अवस्थेत खाली पडला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. त्यांनी पथके तयार करत या आरोपींना ताब्यात घेतलेय