Pune Crime: अल्पवयीन तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, घटनेचा व्हिडिओ स्टेटसला ठेवला

या घटनेमुळे अल्पवयीन तरुण पोलीस आणि कोणालाही घाबरत नाही हे वास्तव समोर येत आहे. चाकण, महाळुंगे परिसरात पोलिसांची दहशत कमी पडत आहे त्यामुळे परिसरात नागरिक, उद्योजक कामगार यात अल्पवयीन तरुणांच्या दहशतीचे सावट निर्माण झाले आहे.

Pune Crime: अल्पवयीन तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, घटनेचा व्हिडिओ स्टेटसला ठेवला
Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पुणे चाकण येथे काल रात्री साडे अकराच्या सुमारास एका सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणाचा दगडाने ठेचून दोघा अल्पवयीन तरुणांनी निर्घृणपणे खून केला. त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या स्टेटसवर ही ठेवला आहे. अल्पवयीन मुलांमधील ही क्रूरता पाहून पिंपरी चिंचवड पोलिसांना धक्का बसला आहे. चाकणमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये ही घटना रात्री घडली. शाब्दिक चकमकीतून सुरू झालेला वादाचे पडसाद थेट हत्येत उमटले आहेत. मृत अल्पवयीन मुलावर चार महिन्यांपूर्वीच हत्येचा गुन्हा दाखल आहे. तर हत्या करणाऱ्यांपैकी एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.  (हेही वाचा - Pune Drug Girl Video: पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? नशेत बेधुंद असलेल्या तरुणींचा हादरवणारा Video व्हायरल)

या घटनेमुळे अल्पवयीन तरुण पोलीस आणि कोणालाही घाबरत नाही हे वास्तव समोर येत आहे.  चाकण, महाळुंगे परिसरात पोलिसांची दहशत कमी पडत आहे त्यामुळे परिसरात नागरिक, उद्योजक कामगार यात अल्पवयीन तरुणांच्या दहशतीचे सावट निर्माण झाले आहे. पोलिसांची भीती कमी होतेय का असा सवाल निर्माण केला जात आहे. अल्पवयीन मुलांनी चाकण परिसरात यापूर्वी सहा खून केलेले आहेत.

या हत्येचा व्हिडीओ त्या दोघांनी बनवला, यात मुख्य आरोपी मृतकाच्या डोक्यात दगड घालताना दिसत असून, तो व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या स्टेट्सवर ठेवण्यात आल्याचं ही समोर आलंय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याआधारे चाकण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेलं आहे. अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी ही पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. अल्पवयीन मुले बहुतांश प्रमाणात गांजाचे सेवन करतात व काही हस्तकांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा गांजा ही विकतात त्यांची साखळी निर्माण झालेली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2024 02:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).