Pune Crime Case: पुण्यात बापाचं निर्घृण कृत्य! घरी कोणी नसताना सावत्र मुलीवर केला बलात्कार,आरोपीला अटक

पुण्यात (Pune) एका पित्याने आपल्या10 वर्षाच्या सावत्र मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Minor Rape Case

Pune Crime Case: पुण्यात (Pune) एका पित्याने आपल्या 10 वर्षाच्या सावत्र मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली आरोपीला अटक करण्यात आले आहे. या खळबळजनक घटनेमुळे पुण्यात मोठी अशांतता पसरली आहे. ही घटना रविवारी दुपारी 1:30 ते 1:45 च्या दरम्यान घडली. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा-  उत्तर प्रदेशच्या ललितपूरमध्ये तरुणाचा खासगी भाग महिलेने कापला)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिते अनेकदा नकार दिल्यानंतर ही आरोपी वडिलांनी अमानुषपणे मुलीवर बळजबरी केली. या प्रकरणी पीडितेच्या आईने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला गेला. आईने दिलेल्या तक्राराच्या आधारे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.  पोलिसांनी पोक्सो (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण) कायदा आणि आयपीसी (भारतीय दंड संहिता) कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

घटनेच्या वेळी पीडित मुलीची आई घरी नव्हती असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आरोपीने घरी कोणी नव्हत या गोष्टीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचे कपडे उतरवले आणि आमिष दाखवून तीच्या शरिराशी गैरवर्तन केले. दरम्यान पीडीत मुलगी खुप घाबरली होती. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तिचा हात पकडून रोखले. पीडितेने सोडून द्यायची विनंती केली परंतु आरोपीने एक ऐकले नाही. सोबत तिला बेदम मारहाण केली. धमकी दिली. आई घरी परत आल्यावर ती बराच वेळ गप्प राहिली. आईने अनेकदा विचारल्यावर तिने सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर आई पर्वती पोलिस ठाण्यात गेली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif