पुणे: Sharjeel Usmani च्या एल्गार परिषदेतील प्रक्षोभक विधानानंतर स्वारगेट पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

पुण्याच्या स्वारगेट पोलिस स्टेशन मध्ये भाजपा युवा मोर्चाचे पुणे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांच्या तक्रारी वरून शरजील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आला आहे.

Pradip Gawade, Who Files complainant against Usmani

30 जानेवारीला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमध्ये विद्यार्थी नेता शरजील उस्मानी (Sharjeel Usmani) याच्या हिंदू समाजाबद्दल प्रक्षोभक विधानानंतर आता त्याचे राजकारणात पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. दरम्यान पुण्याच्या स्वारगेट पोलिस स्टेशन मध्ये भाजपा युवा मोर्चाचे पुणे प्रदेश सचिव प्रदीप गावडे (Pradip Gawade) यांच्या तक्रारी वरून शरजील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आला आहे.

दरम्यान काल महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरजील उस्मानी विररूद्ध कडक कारवाई करावी यासाठी एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. काही वर्षांपूर्वी एल्गार परिषद आणि त्यानंतर भीमा -कोरेगाव मध्ये उसळलेल्या दंगलींचं उदाहरण ताजं असतानाच आता पुन्हा एल्गार परिषदेमधील एक आक्षेपार्ह भाषण अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

शरजील उस्मानी हा अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचा विद्यार्थी नेता आहे. त्याच्या विरोधात आता आयपीसी 153-ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदूविरूद्ध प्रक्षोभक वक्तव्य आणि चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता शरजीलला अटक होणार का? हे पहावं लागणार आहे.

भाजपा नेते राम कदम यांनी सरकारने 3 दिवसांत कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे.