Pune: अजित पवारांविरोधात पुण्यातील भाजपा पदाधिकाऱ्याची पोलिसात तक्रार, जिवाला धोका असल्याची भीती केली व्यक्त

पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपा अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी अजित पवार यांच्याविरोधात खडक पोलिसांत तक्रार दाखल केली

Pune: अजित पवारांविरोधात पुण्यातील भाजपा पदाधिकाऱ्याची पोलिसात तक्रार, जिवाला धोका असल्याची भीती केली व्यक्त
Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

पुण्यातील खडक पोलीस स्थानकात विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपा अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी अजित पवार यांच्याविरोधात खडक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. साळगावकर यांनी त्यांच्या लेटरहेडवर लिहून दिलेली तक्रार पोलिसांनी स्वीकारली आहे.याप्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरु केला असला तरी अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पुण्यातील शिवाजी नगरमधील गणेश खिंड रस्त्यावर एक भूखंड आहे. या भूखंडाची मोजणी करण्यासाठी अजित पवारांनी दबाव आणला आहे. असे रवींद्र साळगावकर यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. मुळात ही मोजणी करता येत नाही. यासंबंधीची फाईल सरकारील कार्यालयात आहे. त्यावर अजित पवारांचं नावही आहे. मी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत आहे. तसेच या प्रकरणाला मी विरोध करत आहे, त्यामुळे अजित पवारांकडून माझ्या जीवाला धोका आहे. असे देखील रविद्र साळगावकरांनी म्हटले आहे.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरु केला असला तरी अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेतलेला नाही.

(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2023 01:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).