पुणे येथील उद्योजकाने तयार केले Sanitization Unit; 15 मिनिटांत नष्ट करणार 99.99% बॅक्टेरिया
हीच बाब लक्षात घेऊन पुणे येथील एका कंपनीने सॅनिटायझेशन युनिट तयार केले आहे. हे सॅनिटायझेशन युनिट युव्ही मॅक्येनिझमवर काम करतं.
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट दाहक रुप धारण करत असताना त्यावर मात करण्यासाठी सरकारसह सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. हीच बाब लक्षात घेऊन पुणे (Pune) येथील PadCare Labs या कंपनीने सॅनिटायझेशन युनिट (Sanitization Unit) तयार केले आहे. या युनिटीची निर्मिती करणारा उद्योजक अजिंक्य धारिया याने सांगितले की, "हे सॅनिटायझेशन युनिट युव्ही मॅक्येनिझमवर (UV Mechanism) काम करतं." या युनिटमुळे 80 चौ. फूटापर्यंतच्या भागातील 99.99% बॅक्टेरिया केवळ 15 मिनिटांत नष्ट होतात, असा या उद्योजकाचा दावा आहे. पुढील आठवड्यापासून हे सॅनिटाझेशन युनिट स्थानिक रुग्णालयात लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापूर्वी पुण्यातील शास्त्रज्ञ मिलिंद कुलकर्णी यांनी कोरोना रुग्णांचे सॅपल गोळ्या करण्यासाठी Polymer-Based Kit ची निर्मिती केली आहे. तर पुण्याच्या डॉ. मीनल भोसले यांनी भारतीय बनावटीचे कोरोना व्हायरसचे पहिले टेस्टिंग कीट बनवण्याचा मान मिळवला आहे.
ANI Tweet:
तामिळनाडू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीने Humanoid Robot ची निर्मिती केली होती. हे रोबो कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टारांना मदत करण्याचे काम करणार आहेत. तर अनेकांनी जनजागृतीचा विडा उचलत कोरोना संबंधित जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिक गरजूंना आपल्या परिने मदत करत आहेत. कोरोना व्हायरसच्या गंभीर संकटावर मात करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्नशील असताना अशा लहान मोठ्या प्रयत्नांची साथ त्यांना मिळत आहे.