पुणे येथील सिंहगड रस्ता परिसरात रेस्टॉरंटमधील पंख्याला गळफास घेऊन बारमालकाची आत्महत्या
अशात झालेल्या नुकसानामुळे किंवा अती ताणातून नैराश्येने त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे
पुणे (Pune) शहरातील सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह गळफास (Hanging) लावलेल्या अवस्थेत शुक्रवारी (26 जून 2020) सकाळी आढळला. पोलिसांनी माहिती तेदाना सांगितले की, हा व्यक्ती एक रेस्टॉरंट कम बार चालवत असे. तो 43 वर्षे वयाचा आहे. आपल्या रेस्टॉरंट कम बारमधील छताच्या पंख्याला त्याने गळफास घेतला.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन आदी कारणांमुळे गेली तीन महिने अनेक व्यवसाय ठप्प आहेत. अशात झालेल्या नुकसानामुळे किंवा अती ताणातून नैराश्येने त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याने आत्महत्ते पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही तशाच आशयाचा मजकूर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी सांगितले की, "तो गुरुवारी सकाळी त्याच्या रेस्टॉरंट-कम-बारच्या छताला असलेल्या पंख्याला लटकलेला आढळला. रात्रीच्या वेळी त्याने आत्महत्या केल्याचे दिसते." (हेही वाचा, ठाणे: प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने 21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या)
आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने म्हटले आहे की, की त्याच्या कृत्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये. लॉकडाऊनमुळे त्याला त्रास सहन करावा लागत होता आणि हॉटेलच्या व्यवसायाला त्याचा फटका बसला असल्याने आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले, अशा आशयाचा मजकूर चिठ्ठीत असल्याचेही शेळके यांनी सांगितले.या संदर्भात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे शेळके म्हणाले