Pune Autorickshaw Rates Hike: पुण्यात 1 ऑगस्ट पासून प्रस्तावित रिक्षादरवाढ तात्पुरती स्थगित

पण आता त्याला तात्पुरता ब्रेक लागल्याची माहिती पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली आहे.

Autorickshaw | Twitter/ AIR Pune

वाढती महागाई सध्या सर्वसामान्यांचं कंबरडं मोडून काढत आहे. पुणे जिल्ह्यात यामध्येच रिक्षादरवाढ (Autorickshaw Rates Hike) प्रस्तावित करण्यात आली होती. पण 1 ऑगस्टपासून होणारी ही दरवाढ आता तूर्तात प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी आता ही दिलासादायक बाब आहे.

पुण्यामध्ये रिक्षाच्या दरांमध्ये किलोमीटर मागे 2 रूपयांची वाढ होणार होती. पण आता त्याला तात्पुरता ब्रेक लागल्याची माहिती पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली आहे. हे देखील नक्की वाचा: CM Eknath Shinde Viral Rickshaw Photo:: सोशल मिडियावर व्हायरल झालेला फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाही; जाणून घ्या नक्की कोण आहे 'ही' व्यक्ती. 

ऑटोरिक्षा भाडेसुधारणा करण्याचा निर्णय 25 जुलैला प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणेच्या बैठकीत घेण्यात आला होता. पहिल्या दीड किलोमीटर साठी किमान 21 रूपये सध्या द्यावे लागत आहेत. त्यामध्ये वाढ करून तो भाडेदर 23 रूपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी भाडं 14 रूपयावरून 15 रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पुण्यातील भाडेदरवाढीचा पुन्हा विचार व्हावा, यासाठी विविध रिक्षा संघटना व प्रवासी संघटनांनी मागणी केली आहे. त्यानुसार आता या भाडेदरवाढीला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. कोरोना संकटानंतर जग पुन्हा अर्थचक्र सुरळित करण्याचा प्रयत्न करत आहे पण वाढते इंधन दर यामुळे महागाईचा भडका जगभरात उडाला आहे.