Pune Air Quality Updates: पुण्यात वायू प्रदूषण, हवेची गुणवत्ता कमालीची खालावली; नागरिकांना आरोग्याच्या समस्या
मुंबई, दिल्ली ही आंतरराष्ट्रीय शहरं आगोदरच वायू प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहेत. त्यातच आता पुणे शहरातही हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली असल्याने हे शहरसुद्धा वायू प्रदूशण अव्वल असलेल्या यादीत समाविष्ठ झाली आहे. पाठिमागील काही दिवसांपासून या शहरातील हवा कमालीची प्रदुशीत झाल्याने नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
Pune Air Pollution: मुंबई, दिल्ली ही आंतरराष्ट्रीय शहरं आगोदरच वायू प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहेत. त्यातच आता पुणे शहरातही हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली असल्याने हे शहरसुद्धा वायू प्रदूशण अव्वल असलेल्या यादीत समाविष्ठ झाली आहे. पाठिमागील काही दिवसांपासून या शहरातील हवा कमालीची प्रदुशीत झाल्याने नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आजवर स्वच्छ हवा, सुंदर आरोग्य अशी ओळख असलेले पुणे शहरही मुंबई (Mumbai News), दिल्लीच्या रांगेत आल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. धक्कादयक म्हणजे नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार हे शहर मुंबई (Mumbai Air Pollution), दिल्ली पेक्षाही अत्यंत वाईट स्थितीला जाऊन पोहोचले आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार, पुण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक तब्बल 161 वर आहे. मुंबई शहरातील हवेचा निर्देशांक पुण्याच्या तुलनेत कमी आहे. जो 145 वर आहे. पुणे शहरातील अत्यंत गजबजलेले ठिकाणी म्हणून ओळख असलेल्या शिवाजीनगर परिसरातील हवा विशेषत: वाईट स्थितीला पोहोचली आहे. शिवाजीनगर परिसरातील हवेची गुणवत्ता पातळी 271 वर आहे. त्यासोबतच भूमकर चौक परिसरातील हाच एक्यूआय 260 वर पोहोचला आहे. पुणे शहरातील केवळ पाषाण आणि कात्रज परिसरातच काय ती हवेची स्थिती समाधानकारक आहे. अन्यथा उर्वरीत जवळपास सर्वच ठिकाणी हवेची पातळी मॉडरेट श्रेणीमध्ये पोहोचली आहे.
विविध संस्थांनी पाठिमागील चार वर्षांमध्ये केलेल्या अभ्यासामध्ये आढळून आले आहे की, हिवाळ्यामध्ये मुंबईची हवा दिल्लीच्या तुलनेत अधिक प्रदुषीत राहिली आहे. खास करुन चेंबुर परिसरात हवा अधिक प्रदुषीत आढळली. ताज्या आकडेवारीनुसार, विविध शहरातील हवेचा निर्देशांक खालील प्रमाणे:
मुंबई (चेंबूर परिसर) एक्यूआय - 304
बदलापूर एक्यूआय- 243
बेलापूर एक्यूआय- 138
नवी मुंबईतील एक्यूआय- 261
उल्हासनगर एक्यूआय- 269
मुंबई शहरातील हवेचा निर्देशांक सुधारावा आणि वायूप्रदूषण कमी व्हावे, यासाठी पालिका प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. बीएमसीने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. शिवाय, खासगी आणि सार्वजनिक प्रकल्पांचे बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांना आणि कंत्राटदारांना पालिकेने नोटीसही पाठविल्या आहेत. या नोटीसीमध्ये बांधकाम सुरु असताना धूळ उडणार नाही याची काळजी घेण्यात यावी. त्यासाठी आश्यक त्या ठिकाणी पाण्याची फवारणी करावी, बांधकाम सुरु असलेल्या ईमारतीय ताडपत्री, पत्रे लवून बंदिस्त करण्यात याव्यात. शिवाय धूळनियंत्रण नर्देशही या कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)