IPL Auction 2025 Live

पुण्यातील APMC मार्केट अखेर 50 दिवसानंतर आजपासून सुरु, 11 हजार क्विंटल शेतमालाची आवक

आजपासून पुण्यातील एपीएमसी मार्केट (APMC Market) अखेर 50 दिवसानंतर पुन्हा सुरु करण्यात आले आहे.

Pune APMC Market (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. परंतु शनिवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने देशव्यापी लॉकडाऊन 5.0 ची घोषणा करत तो येत्या 30 जून पर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये अनुक्रमे Phase 1,2 आणि 3 नुसार कोणत्या गोष्टी सुरु करण्यात याव्यात यासंदर्भात सांगितले आहे. याच दरम्यान, आजपासून पुण्यातील एपीएमसी मार्केट (APMC Market) अखेर 50 दिवसानंतर पुन्हा सुरु करण्यात आले आहे. मार्केटचे अॅडमिनिस्ट्रेटर बीजी देशमुख यांनी असे म्हटले आहे की, मार्केटमध्ये 11 हजार क्विंटल शेतमालाची आवक झाली आहे. हा शेतमाल जवळजवळ 200 गाड्यांमधून मार्केटमध्ये आणण्यात आल्याचे ही देशमुख यांनी म्हटले आहे.

एपीएमसी मार्केट मध्ये आलेल्या लोकांच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी सुद्धा तपासून पाहण्यासोबत निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्याचसोबत व्यक्तींना मास्क घातला आहे की नाही याची सुद्धा तपासणी करण्यात आली. तसेच मार्केटमध्ये सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन सुद्धा करण्यात आल्याचे बीजी देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.(Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहात असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोना संक्रमित रुग्ण, जाणून घ्या ताजे अपडेट्स)

दरम्यान, पुण्यात कोरोनाचे 7537 रुग्ण असून 320 जणांचा बळी गेला आहे. तसेच 3559 जणांची प्रकृती सुधारली आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा केली जात आहे. तर महाराष्ट्रात आज लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असून राज्य सरकार याबाबत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.