Pune Accident Video: पुण्यात पेट्रोल टॅंकरची दुचाकीला धडक; जुळ्या मुलांचा मृत्यू पालक जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. दोन्ही जुळ्या मुलांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला असून आईला पायाला गंभीर जखम झाली आहे. सध्या तिच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

Pune Accident Video: पुण्यात पेट्रोल टॅंकरची दुचाकीला धडक; जुळ्या मुलांचा मृत्यू पालक जखमी
Accident | Twitter

पुण्यामध्ये (Pune)  सोमवार 16 ऑक्टोबर दिवशी दुचाकी ला पेट्रोल टॅंकरने (Petrol Tanker) धडक दिल्याने विश्रांतवाडी (Vishrantwadi) भागामध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 2 लहान जुळ्या मुलींचा मृत्यू झाला आहे तर त्यांचे आई वडील जखमी आहेत. हा अपघात काल संध्याकाळी 5 च्या सुमारास झाला आहे.

सतिश झा नामक 40 वर्षीय पुरूष दुचाकी चालवत होता. त्याच्या सोबत साडेतीन वर्षांची जुळी मुलं होती. तसेच पत्नी देखील प्रवास करत होती. त्यांच्या दुचाकीला मागून एका पेट्रोल टॅंकरने विश्रांतवाडी चौक च्या सिग्नल जवळ धडक दिली. सिग्नल हिरवा होताच पेट्रोल टॅंकर पुढे सरकला आणि त्याची धडक बाईकला बसली.  हा ट्रक  एअरपोर्ट कडून भोसरी कडे जात होता. यामध्ये मृत्यू पावलेल्या दोन्ही मुली होत्या. दरम्यान यामध्ये प्रमोद कुमार यादव या टॅंकर चालकाला अटक करण्यात आली आहे.  नक्की वाचा: Pune Accident Video: पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, ट्रकला आग, चार ठार, दोन जखमी.

पहा अपघाताची दृश्य 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. दोन्ही जुळ्या मुलांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला असून आईला पायाला गंभीर जखम झाली आहे. सध्या तिच्यावर ससून हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. तर वडीलांना लहान सहान जखमा आहेत. अपघाताबद्दल पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पेट्रोल टॅंकर चालकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस पुढे अधिक तपासही करत्त असल्याची माहिती देण्यात आली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2023 09:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).