पुणे: दारूच्या नशेत ट्र्क चालकाची दुचाकी स्वारांना धडक; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

पोलिसांच्या तपासानुसार हा ट्रक चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याने हा अपघात झाला आहे .या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Pune road Accident (Photo Credits: ANI)

पुणे (Pune) येथील मुळशी (Mulshi) तालुक्यातील लवळे फाटा (Lavale Phata) जवळ पिरंगुट घाट (Pirangut)  उतारावर एका भरधाव येणाऱ्या ट्रकने रस्त्यावरील दुचाकींना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याचे समजत आहे. पोलिसांच्या तपासानुसार हा ट्रक चालक दारू पिऊन  गाडी चालवत असल्याने हा अपघात झाला आहे .या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पादचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तूर्तास हे जखमी पिरंगुट येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, आज म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. पिरंगुट घाट उतरावर एका ट्रकने काही दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकीत दुचाकींवरील पाच जणांना उडविले. यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा  अपघात होताच गांगरून गेलेल्या ट्रकचालकाने तात्काळ येथून पाल काढणायचा प्रयत्न केला मात्र घोटावडे फाटा येथे वाहतूक पोलीस मयूर निंबाळकर व इतर नागरिकांनी पकडले या ट्रक चालकाला पकडून बेड्या ठोकल्या. यानंतर त्याची चाचणी करताच ट्रकचालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले.

ANI ट्विट

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे तसेच अपघातातील मृतांची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.