कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयीन पथकाने आज पुणे महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाचा घेतला आढावा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने (Inter-Ministerial Central Team) दिले आहेत. कोरोना विषाणूचे जाळे पसरत चालले आहे.

कोरोना विषाणूने (COVID19) संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने (Inter-Ministerial Central Team) दिले आहेत. कोरोना विषाणूचे जाळे पसरत चालले आहे. याचाच आढावा घेण्यासाठी केंद्रीय स्तरावरील पथक सोमवारी पुण्यात (Pune) दाखल झाले होते. ज्या शहरात लॉकडाऊनचे उल्लंघन केले जात आहेत, तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रालयीन पथक स्थापन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचे संसर्ग कमी न झालेल्या भागात, तसेच लॉकडाऊनचे पालन न होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये हे पथक पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार, केंद्रीय मंत्रालयाचे एक पथक पुण्यात दाखल झाले असून आज त्यांनी महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाचा आढावा घेतला आहे.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, मध्यप्रदेशात इंदौर, राजस्थानात जयपूर आणि पश्चिम बंगालमधील कोलकाता, हावडा, पूर्व 24 परगणासह काही भागात स्थिती चिंताजनक बनली आहे. येथे लॉकडाऊनचे पालन काटेकोरपणे झाले नाही, तर संक्रमण वाढण्याचा अधिक धोका आहे. त्यामुळे इथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली होती. हे देखील वाचा- धक्कादायक: 22 मार्चपासून आज पहाटे 4 वाजेपर्यंत 11 पोलीस अधिकाऱ्यांसह 38 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; महाराष्ट्र पोलिसांची माहिती

एएनआयचे ट्वीट-

देशातल सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. मुंबई आणि पुणे येथील परिस्थितीगंभीर बनत चालली आहे. त्यामुळे केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्यावतीने हे पथक माहिती घेणार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्याबाबतीत मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. या मागील वस्तुस्थिती केंद्रीय पथकाने जाणून घेतली. सर्व विभाग समन्वयाने काम करीत आहे, ही समाधानाची बाब असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच अन्न आणि धान्याचे वितरण व्यवस्थित करावे आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा, अशी सूचना केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिव संजय मल्होत्रा यांनी दिली होती.



संबंधित बातम्या

NZ W vs AUS W 2nd ODI 2024 Preview: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

IND W vs WI W: महिला टीम इंडियाने रचला इतिहास, मंधाना-घोषच्या जोरावर तोडला सर्वोच्च T20 धावांचा विक्रम

Australia Squad For Border Gavaskar Trophy 2024-25: ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटींसाठी संघ केला जाहीर, नॅथन मॅकस्विनी आणि जोश हेझलवूडच्या जागी या तरुणांना मिळाले स्थान

WI vs BAN 3rd T20I 2024 Scorecard: तिसऱ्या T20 मध्ये बांगलादेशने वेस्ट इंडिजचा 80 धावांनी पराभव करत 3-0 दिला व्हाईटवॉश, फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांचीही शानदार खेळी

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif