पुणे: 200 फूट खोल बोअरवेलमध्ये 10 फुटांवर अडकला 6 वर्षांचा मुलगा

अंबेगाव पोलीसांनीही (Ambegaon Police Station) या घटनेस दुजोरा दिला आहे. पोलीस आणि NDRF चे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. मदत आणि बचावकार्य सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Pune: A 6-year-old boy is trapped in a borewell at about 10 feet depth at a village in Ambegaon | (Photo Credits: ANI)

तब्बल 200 फूट खोल असलेल्या एका बोअरवेलमध्ये एक 6 वर्षांचा मुलगा पडल्याचे धक्कादायक वृत्त आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील अंबेगाव (Ambegaon) येथली एका गावात ही घटना घडली. बोअरवेल 200 फूट खोल असली तरी, हा मुलगा साधारण 10 फूट अंतरावर अडकला आहे. अंबेगाव पोलीसांनीही (Ambegaon Police Station) या घटनेस दुजोरा दिला आहे. पोलीस आणि NDRF चे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. मदत आणि बचावकार्य सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे.

लहान मुले बोअरवेलमध्ये पडल्याची ही काही पहिलीच घटना नाही. याही पूर्वी अनेकदा अशा घडल्या आहेत. यावर उपाय म्हणजे मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे. धोक्याच्या ठिकाणी जाऊ न देणे. परंतू, कोणताही अपघात सांगून घडत नाही. त्यामुळे अपघात घडल्यानंतर आपण डोके शांत ठेऊन काय क्रिया करतो आणि कोणते निर्णय घेतो हे महत्त्वाचे.

बोअरवेलमध्ये कोणी पडल्याचे लक्षात येताच काय करावे

घाबरुन जाऊ नका. तुमच्या घाबरण्याने अडकलेले बालक बोअरवेलमधून बाहेर येणार नाही. डोकं शांत ठेऊन कोणताही गोंधळ न करता तातडीने पोलीसांना संपर्क करा. जवळच्या सरकारी कार्यालयाशी संपर्क करा. जेणेकरुन NDRF जवानांशी तातडीने संपर्क करता येईल. पोलीस किंवा NDRF जवान घटनास्थळी मदत आणि बचावकार्य करण्यासाठी आले असता घटनास्थळी गर्दी करु नका. नको त्या वेळी नको ते प्रश्न विचारुन अधिकाऱ्यांच्या कामात व्यत्यय आणू नका. शक्य तितकी मदत करा.पोलीस अथवा NDRF जवान घटनास्थळी येईपर्यंत बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाच्या संपर्कात राहा. शक्य झाल्यास हलकासा प्रसाश बोअरवेलमध्ये सोडता आल्यास पाहा.