डाळी महागल्या - प्रतिकिलो 10 ते 15 रुपयांची वाढ
त्यामुळे याचा परिणाम डाळींच्या किंमतीवर झाला आहे.
अवकाळी पावसामुळे कृषी उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे याचा परिणाम डाळींच्या किंमतीवर झाला आहे. तर वाशीच्या घाऊक बाजारात यांचे दर पाच ते सात रुपयांनी वाढले असून डाळींच्या दरांनी शंभरी गाठली आहे.
गेल्या काही दिवसांपासून डाळींच्या किंमतीत प्रतिकिलोमागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तर मसूर, उडीद, चणाडाळ आणि मूगडाळ यांच्या किंमती 90 रुपयांना जाऊन पोहचल्या आहेत. परंतु सरकारकडे डाळीचा मोठा साठा असून अद्याप याबद्दल गप्प आहेत. यंदा मराठडवाड्यासह राज्यात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे कडधान्य आणि डाळीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
तर वाढत्या डाळींच्या किंमतीवर सरकारने योग्य वेळी निर्णय न घेतल्यास दरामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.