MSRTC Strike: शरद पवार यांचे निवासस्थान 'सिल्वर ओक' येथे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

आक्रमक आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबई येथील 'सिल्वर ओक' या निवास्थानी दाखल झाले.

MSRTC Employees | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

एसटी महामंडळाचे विलिनीकरण करा या मागणीसाठी पाठिमागील अनेक महिन्यांपासून आंदोलन ( MSRTC Strike) करणारे आंदोलक आज (8 एप्रिल) अचानक आक्रमक झाले. आक्रमक आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबई येथील 'सिल्वर ओक' या निवास्थानी दाखल झाले. या आंदोलकांनी 'सिल्वर ओक' येथे जाऊन आंदोलन सुरु केले. या ठिकाणी आंदोलकांनी चप्पल आणि दगडफेक केल्याचेही वृत्त आहे. सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर मोठा बंदोबस्त नसल्याने हे कर्मचारी थेट सिल्वर ओकपर्यंत पोहोचले. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोहोचले.

आक्रमक आंदोलकांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सिल्वर ओकबाहेर आल्या. त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत थेट बोलण्याची तयारी ठेवली. परंतू, कर्मचारी इतके आक्रमक होते की त्यांचा आवाज जमावसमोर पोहोचूच शकला नाही. त्यामुळे त्या पुन्हा आपल्या निवासस्थानात गेल्या.

ट्विट

दरम्यान, घटनास्थळी मुंबई पोलीस मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. काही आंदोलकांना स्कूलबसच्या माध्यमातून पोलिसांनी स्थलांतरीत केले जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif