Sex Racket Busted in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड येथील वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका; स्पा मालकास अटक

पिंपरी चिंचवड (Sex Racket Pimpri Chinchwad) शहरातील हिंजवडी परिसरात हा गोरखधंदा सुरु होता. पुणे पोलिसांना याची माहिती मिळताच धाड टाकत धडक कारवाई करण्यात आली.

Sex Racket in Spa| (Photo credit: archived, edited, representative image)

Pune Police News: स्पा आणि पार्लरच्या (Spas Centres) नावाखाली सुरु असलेले रेक्स रॅकेट (Sex Racket Pune) पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. पिंपरी चिंचवड (Sex Racket Pimpri Chinchwad) शहरातील हिंजवडी परिसरात हा गोरखधंदा सुरु होता. पुणे पोलिसांना याची माहिती मिळताच धाड टाकत धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत तिन महिलांची सुटका करण्यात आली तर स्पा चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या मानवी तस्करी विभाग पिंपरी चिंचवड द्वारा सदर स्पा आणि पार्रलवर अचानक धाड टाकण्यात आली. या स्पामध्ये ब्रेथ स्पाच्या नावाखाळी वेश्या व्यवसाय सुरु होता. पाठिमागील काही दिवसांपासून या ठिकाणी अवैध प्रकार सुरु असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी माहितीची पडताळणी करत कारवाई केली.

पुणे पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी विभागाचे पोलीस निरिक्षक देवेंद्र चव्हाण यांनी वृत्तसंस्था एएनआयला माहिती देताना सांगितले की, स्पा व्यवसायाच्या नावाखाली पिंपरी चिंचवड शहरांतील अनेक पार्लर्समध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही कारवाई केली. त्यासाठी आम्ही मिळालेल्या माहतीच्या आधारे स्पावर अचानक धाड टाकली. या वेळी आम्हाला तिथे तीन महिला कार्यरत असल्याचे आढळून आले. आम्ही तिन महिलांची सुटका केली आणि स्पा चालकासह दोघांना अटक केली. आरोपींविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, 1956 चे कलम 3, आणि 7 आणि आयपीसी कलम 370(3), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. (हेही वाचा : Sex Racket: पिंपरी चिंचवडमध्ये व्हॉट्सअॅपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांकडून तीन महिलांची सुटका)

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. (हेही वाचा :Sex Racket In Pune: थाई महिलेद्वारे अपार्टमेंटमध्ये चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी दोन पीडितांची केली सुटका )

स्पा म्हणजे काय?

'स्पा' हा मूळ लॅटीन शब्द आहे. ज्यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. अलिकडील काळात स्पा हा एक प्रमुख व्यवसाय बनला आहे. ज्यामध्ये मालिश, आरोग्यदायी उपचार आणि इतर बाबींचाही त्यामध्ये सामावेश केला जातो. आज समाजामध्ये आरोग्य उद्योगात भरभराट होत असताना स्पा म्हणजे काय? याची व्याख्या विश्वाप्रमाणेच वेगाने विस्तारत आहे. व्यापक अर्थाने, स्पा ही एक आस्थापना आहे. जी काही प्रकारचे आरामदायी, उपचारात्मक किंवा सौंदर्य उपचार देते. उपचारांमध्ये साध्या पेडीक्योर आणि मसाजपासून ते प्रिकली पिअर बटर रॅप्स आणि योगापर्यंत अनेक बाबींचा समावेश होतो. स्पा सेंटर्समध्ये तुम्ही एकाच उपचारासाठी, पूर्ण स्पा दिवसासाठी किंवा सर्वसमावेशक पॅकेजसाठी जाऊ शकता. समाजात अनेक प्रकारचे स्पा आहेत. या स्पामध्ये स्टीम रूम्स, विश्रांती खोल्या आणि जकूझी असलेल्या विस्तृत वेलनेस पॅलेसपासून ते परवडणाऱ्या एका खोलीच्या सलूनपर्यंत असू शकतात. बहुतांश स्पा नियमाने चालतात मात्र काही ठिकाणी मात्र स्पा च्या नावाखाली चुकीचे प्रकार घडतात. ज्यावर पोलीस कारवाई करतात.