Property Registration आता विकेंडला देखील सुरू राहणार; राज्यात एकूण 27 कार्यालयांत मिळणार सुविधा
पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील दोन कार्यालये, कोथरूडमधील दोन आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एका कार्यालयात सुरू ठेवण्यात येणार आहेत.
आता महाराष्ट्रामध्ये प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन (Property Registration) कार्यालयं शनिवार-रविवारी देखील खुली राहणार आहेत. मुंबई (Mumbai) मधील 1 आणि पुण्यातील (Pune) 1 कार्यालयांसह एकून 27 कार्यालयं विकेंडला खुली राहणार आहेत. त्यामुळे आता नागरिकांना आठवडाभरात आता कधीही त्यांच्या प्रॉपटीच्या रजिस्ट्रेशनसाठी कार्यालयामध्ये जाता येणार आहे. पूर्वी 516 पैकी केवळ राज्यातील 5 कार्यालयं शनिवार-रविवार सुरू राहणार होती.
IGR HH Sonawane यांनी काल Pune Times Mirror शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. वीकेंडला काम करण्याची परवानगी असलेल्या 27 नोंदणी कार्यालयांपैकी पाच पुण्यात आणि मुंबई शहर, ठाणे, नाशिक आणि नागपूर येथे प्रत्येकी एक असल्याचं म्हटलं आहे.
अनेक जणांना घरांच्या खरेदी नंतर आपल्या कामाच्या वेळेमुळे, स्वरूपामुळे कामाच्या दिवसांपेक्षा वीकेंडला कागदपत्रांची नोंदणी करणे पसंत केले जाते. त्यामुळे या निर्णयाची मागणी होत होती. यापूर्वीही विकासकांकडून मागणी करण्यात आली होती. Mumbai Property Registration: मुंबई बीएमसी क्षेत्रात घर विक्रीत वाढ सुरू, नाइट फ्रँक इंडियाने दिली माहिती .
पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील दोन कार्यालये, कोथरूडमधील दोन आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एका कार्यालयात सुरू ठेवण्यात येणार आहेत. अतिरिक्त तासांची भरपाई करण्यासाठी, या 27 नोंदणी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळेल.