Mumbai Police Advisory: मालमत्ताधारकांनो मुंबई पोलिसांना द्या मालमत्तांचा तपशील; असा भरा अर्ज, जाणून घ्या मार्गदर्शक तत्वे

या तत्वांमध्ये पोलिसांनी मालमत्ता मालक आणि जमीनमालकांना परिसर आणि ज्या व्यक्तीला जागा भाड्याने दिली होती त्याचा तपशील पोलीस प्रशासनाकडे देण्यास सांगितले आहे. या मार्गदर्शक तत्वांचा तपशील खालील प्रमाणे.

Property Registration | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

मुंबई शहरातील विविध मालमत्तांचे मालक (Property Owners) आणि जागा भाड्याने देऊ पाहणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी ( Landlords of Properties) मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक तत्वे (Mumbai Police Advisory for Property Owners) जारी केली आहेत. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ही मार्गदर्शक तत्वे 28 ऑक्टोबर रोजी जारी केली आहेत. या तत्वांमध्ये पोलिसांनी मालमत्ता मालक आणि जमीनमालकांना परिसर आणि ज्या व्यक्तीला जागा भाड्याने दिली होती त्याचा तपशील पोलीस प्रशासनाकडे देण्यास सांगितले आहे. या मार्गदर्शक तत्वांचा तपशील खालील प्रमाणे.

मालमत्तांचे मालक आणि मालमत्ताधारकांसाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये पोलिसांनी म्हटले आहे की, मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील भागात सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता, विध्वंसक/असामाजिक घटक रहिवासी भागात लपून बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांतता भंग होण्याची, व्यवस्थेला खीळ बसण्याची आणि जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मालमत्तांचे मालक आणि मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तांचा तपशील अथवा माहिती पोलिसांना द्यावी. पोलिसांनी सांगितले की, हा आदेश 6 नोव्हेंबर 2022 पासून अंमलात येईल. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 188 अन्वये दंडनीय असेल. (हेही वाचा, New Rule From November: 1 नोव्हेंबरपासून बदलणार 'हे' सरकारी नियम; तुमच्या खिशावर 'असा' होणार परिणाम? वाचा सविस्तर)

तुम्ही तुमच्या मलमत्तांचा तपशील पोलिसांकडे कसा द्याल? घ्या जाणून

पोलिसांच्या आदेशात उल्लेख आहे की, मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या कोणत्याही घर/मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घरमालक/मालक/व्यक्तीने, ज्याने कोणत्याही व्यक्तीला राहण्याची जागा भाड्याने दिली/उपलब्ध केली आहे, त्यांनी तत्काळ तपशील सादर करावा. हा तपशील सिटीझन पोर्टलवर किंवा www.mumbaipolice.gov.in वर उक्त भाडेकरू/भाडेकरू आदिंबाबत ऑनलाइन माहिती द्यावी.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif