Privilege Motion On Sanjay Raut: हक्कभंग प्रस्ताव संजय राऊत यांच्यावर पण भरत गोगावले अडचणीत; सत्ताधाऱ्यांची कोंडी; राहुल नार्वेकरांनी रेटलं कामकाज

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे नेते संजय राऊत (Privilege Motion On Sanjay Raut) यांनी विधिमंडळासंदर्भात केलेल्या वक्तव्या प्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या आमदरांनी हक्कभंग प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह विधानसभेमध्ये चर्चा झाली. या प्रस्तावावर बोलताना सत्ताधारी सदस्यांपैकी बहुतेकांनी संजय राऊत यांना अटक करा अशी मागणी केली.

Bharatshet Gogawale | (File Image)

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे नेते संजय राऊत (Privilege Motion On Sanjay Raut) यांनी विधिमंडळासंदर्भात केलेल्या वक्तव्या प्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या आमदरांनी हक्कभंग प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह विधानसभेमध्ये चर्चा झाली. या प्रस्तावावर बोलताना सत्ताधारी सदस्यांपैकी बहुतेकांनी संजय राऊत यांना अटक करा अशी मागणी केली. दरम्यान, सभागृहात बोलताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांची जीभ भलतीच घसरली. बोलताना भावनेच्या भरात वाहावत जात गोगावले यांनी थेट शिवगाळच केली. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणताना भरत गोगावले यांच्या विधानामुळे सत्ताधाऱ्यांचीच कोंडी झाली.

विधिमंडळ हे महाराष्ट्राचे सर्वोच्च सभागृह आहे. लाखो जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी येथे येतात. अशा सर्वोच्च सभागृहाला कोणी चोरमंडळ म्हणत असेल तर तो त्या लाखो, करोडो जनतेचा अपमान आहे, अशी भावना भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी व्यक्त केली. या वेळी संजय राऊत यांच्यावर आगपाखड करत सत्ताधारी आमदारांनी जोरदार वातावरण निर्मिती केली. ही वातावरण निर्मिती करताना आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली. (हेही वाचा, Rahul Narvekar On Sanjay Raut: संजय राऊत यांच्या 'विधिमंडळ चोरमंडळ' वक्तव्यावर 2 दिवसांत चौकशी करून 8 मार्चला निर्णय देणार- विधानसभा अध्यक्षांची घोषणा)

भरत गोगावले काय म्हणाले?

संजय राऊत यांच्या विरोधात दाखल हक्कभंग प्रस्तावावर बोलताना भरत गोगावले यांची जीभ घसरली. असंसदीय शब्दाचा वापर करत भरत गोगावले म्हणाले. संजय राऊत सभागृहाबाहेर जे काही बोलले त्याची क्लिप आम्ही सगळ्यांनी ऐकली. आपणही ऐकली असेल. एखाद्याने #$%*खावी असावे पण इतकेही भा $ खाऊ असू नये. असे म्हणत भगरत गोगावेले यांनी आपल्या भावना मांडल्या.

विधानसभा अध्यक्षांकडून कामकाज स्थगित

दरम्यान, भरत गोगावले यांचे विधान ऐकून विरोधक अत्यंत संतप्त झाले. सभागृहाबाहेर जर कोणी एखादे व्यक्तव्य केले असेल आणि त्यावर इतकी मोठी कारवाई केली जात असेल तर सभागृहात काय बोलले जात आहे याकडेही लक्ष दिले पाहिजे. सभागृहात उच्चारलेले शब्द तपासून मागे घेतले गेले पाहीजेत, असे म्हणत विरोधकांनी कामकाज रोखून धरले. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेरकर यांनी विधान तपासून घेतले जाईल, अता बसा. कामकाज पुढे जाऊ द्या असे म्हणत कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांच्या गदारोळापुढे आणि सत्ताधाऱ्यांच्या गोंधळामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज स्थगित केले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now