Privilege Motion Against Kangana Ranaut: कंगना रणौत हिच्याविरुद्ध विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल

या लिखानात कंगना रनौत हिने म्हटले होते की, 'मला गुंड आणि माफिया यांच्यापेक्षा मुंबई पोलिसांची अधिक भीती वाटत आहे.' यासोबतच तिने मुंबई शहराचा संबंध तिने थेट पाकव्याप्त काश्मीर सोबत जोडला होता. त्यावरुन महाराष्ट्रभर तीव्र पडसात उमटले होते. हे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहे.

Kangana Ranaut | (Photo Credits: Facebook)

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई शहरासंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव (Privilege Motion) दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी हा प्रस्तव विधान परिषदेत दाखल केला आहे. भाई जगताप यांनी दाखल केलेला हक्कभंग प्रस्ताव (Privilege Motion Against Kangana Ranaut) विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्वीकारला आहे. हा प्रस्ताव स्वीकारताना रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले की, हक्कभंग समितीच्या अनुपस्थितीत मी स्वत:च या प्रस्तावावर निर्णय घेईन.

कगंना रनौत हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आक्षेपार्ह लिखान केले होते. या लिखानात कंगना रनौत हिने म्हटले होते की, 'मला गुंड आणि माफिया यांच्यापेक्षा मुंबई पोलिसांची अधिक भीती वाटत आहे.' यासोबतच तिने मुंबई शहराचा संबंध तिने थेट पाकव्याप्त काश्मीर सोबत जोडला होता. त्यावरुन महाराष्ट्रभर तीव्र पडसात उमटले होते. हे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहे.

कंगना रनौत हिच्या विधानावरुन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यासह इतरही काही विविध राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. राजकीय पक्षांसोबत मराठी अभिनेते काही हिंदी अभिनेते आणि विविध संघटनांनीही कंगना हिच्याविरुद्ध टीका करताना दिसत आहेत.(हेही वाचा,Privilege Motion Against Arnab Goswami: अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर )

दरम्यान, कंगना रनौत हिच्यासोबतच एका खासगी वृत्तवाहिनीचे संपादक आणि निवेदक पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या विरोधातही हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रस्तावाला अनुमोदन देत चर्चेची मागणी केली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी या प्रस्ताववर नियमानुसार कार्यवाही करण्याचे अश्वासन दिले.