पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात : कल्याण मेट्रो भूमिपूजनासह, पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करणार
म्हणूनच केंद्रातील भाजप सरकारडून विविध विकासकामांचा धडाका उडवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi)आज (मंगळवार, 18 डिसेंबर) महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. हवाई दलाच्या विशेष विमानाने सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन होईल. ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो प्रकल्पाचे (Kalyan Bhiwandi Metro Project) भूमिपूजन व कल्याणला सिडकोच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पायाभरणीसाठी ते मुंबईत येत आहेत. या कार्यक्रमानंतर ते पुण्याला रवाना होतील. तेथे तेथे ते पुणे मेट्रोच्या (Pune Metro Project) तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत.
कसा असेल मोदींचा दौरा?
- हवाई दलाच्या विशेष विमानाने सकाळी दहाच्या सुमारास मुंबई विमानतळावर आगमन.
- विमानतळावर आगमन झाल्यावर ते हेलिकॉप्टरने कुलाबा येथील आयएनएस शिक्रा या नौदलाच्या तळावर उतरतील.
- साडेअकराला राजभवनवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थिती. या कार्यक्रमात ‘टाइमलेस लक्ष्मण’ या पुस्तकाचे प्रकाशन
- राजभवनातील कार्यक्रम आटोपल्यावर कल्याणकडे रवाना
- कल्याणच्या फडके मैदानात मोदींच्या हस्ते मेट्रो आणि गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन. त्यानंतर पुण्याकडे रवाना..
- पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात आयोजित सोहळ्यात पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन
- सर्व कार्यक्रम आटोपल्यावर राजधानी दिल्लीकडे रवाना
(हेही वाचा, राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद-नरेंद्र मोदी भेट; चर्चेनंतर मालदीवला 1.4 अब्ज डॉलरची मदत जाहीर)
दरम्यान, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीगड या राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे भाजप खडबडून जागा झाला आहे. म्हणूनच केंद्रातील भाजप सरकारडून विविध विकासकामांचा धडाका उडवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या विकासकामांच्या उद्घाटकनासाठी स्वत: मोदी लक्ष घालत असून, प्रत्येक ठिकाणी स्वत: हजर राहण्यावर त्यांचा अधिक भर असल्याचेही समजते.