Pravin Darekar यांच्या ताफ्यातील गाडीला महिनाभरात तिसर्यांदा अपघात; प्रसाद लाड यांच्याकडून घातपाताचा संशय व्यक्त
सध्या ते विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत. राज्यभरात पक्षाच्या कामासाठी ते फिरत असतात. यावेळी हे सारे अपघात झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भाजपा नेते आणि विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या ताफ्यातील वाहनाला आज (19 फेब्रुवारी) मुंबईत (Mumbai) पुन्हा अपघात झाला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार सकाळी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर (Jogeshwari - Vikhroli Link Road)
हा अपघात झाला आहे. त्यांच्या ताफ्यातील गाडीला मागील महिनाभरामध्ये तिसर्यांदा अपघात झाल्याने यामागे घातपात (Assassination) असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रविण दरेकर यांच्यासमवेत भाजपा नेते प्रसाद लाड आणि गोपिचंद पडळकर यांनी देखील घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत भाजपा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी मीडीयाशी बोलताना सांगितले आहे. नक्की वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रविण दरेकर यांच्यात भेट; जाणून घ्या काय आहे कारण .
काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये त्यानंतर खंडाळ्यात प्रविण दरेकर यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघातांमध्ये त्यांच्या गाडीसमोर बाईकस्वार आला होता त्यामुळे भाजपाचा यामध्ये घातपाताचा संशय आहे.
प्रसाद लाड
प्रविण दरेकर हे भाजपाचे आमदार आहेत. सध्या ते विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत. राज्यभरात पक्षाच्या कामासाठी ते फिरत असतात. यावेळी हे सारे अपघात झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या ताफ्यातील पोलिस वाहनाला या अपघातामध्ये ठोकण्यात आहे.