Praveenkumar Mohare's 'Monkey-Style Protest At Shivaji Park: सिनेनिर्माते प्रवीणकुमार मोहरे यांची छत्रपती शिवाजी पार्क मध्ये झाडावर चढून गळफास घेण्याची धमकी; AWBI AWB

त्याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रवीणकुमार यांनी हे अनोखं आंदोलन केले आहे.

प्रविणकुमार मोहरे | X

दादर च्या छत्रपती शिवाजी पार्क (Shivaji Park) मध्ये एक सिने निर्माता आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) करण्यासाठी झाडावर चढल्याने मोठा गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रविणकुमार मोहरे (Praveenkumar Mohare) असं या निर्मात्याचं नाव आहे. अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया च्या जाचक अटींविरूद्ध आवाज उठवताना त्याने आज आत्महत्येची धमकी दिली आहे. दरम्यान त्याला खाली उतरवण्यासाठी तातडीने अग्निशामक दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले.

कोणी झाडावर आल्यास गळफास घेऊन आत्महत्या करणार असल्याचं त्यांनी म्हटल्यानंतर काही वेळ तेथे गोंधळ उडाला होता. दरम्यान पोलिस आणि अग्निशामन दलाकडून समजूत काढून बर्‍याच परिश्रमांनंतर त्यांनी प्रविणकुमार मोहरेची सुटका केली आहे. झाडावरून खाली उतरवल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या शिवाजी पार्कामधील हा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

प्रविणकुमार मोहरे यांनी नेमकं काय मागितलं आहे?

सध्याच्या नियमांनुसार, सिनेमामध्ये प्राण्यांचा वापर करायचा असेल तर Animal Welfare Board of India ला 30 हजार रूपये द्यावे लागतात. त्यानंतर त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र दिलं जातं. शुल्क न भरल्यास प्राण्यांचा सीन टाळावा लागतो. या नियमावरून आक्रमक होत प्रविणकुमार यांनी 30 हजार भरले म्हणजे त्यांच्यावरील अन्याय दूर होतो का? असा सवाल केला आहे.

प्रविणकुमार यांचा एक सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यामध्ये प्राण्यांचे सिन्स आहेत पण या नियमांमुळे सेंसॉर कडून हिरवा कंदिल मिळत नाही आणि सिनेमा प्रदर्शनाला उशिर होत आहे. जनावरांच्या बेकायदेशीर कत्तली रोखण्यापेक्षा Animal Welfare Board of India निर्मात्यांकडून पैसे उकळत असल्याचा दावा केला आहे.