Pooja Khedkar Case: पूजा खेडकर हिमनगाचे टोक; अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी रॅकेट; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
त्यामुळे चौकशी जसजशी पुढे सरकेर तसतसे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दिंव्यंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे देऊन अनेकांना सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी अनधिकृत मदत करण्याचा प्रकार राजरोसपणे सुरु आहे.
प्रशिक्षणार्थी निलंबीत IAS पूजा खेडकर (Pooja Khedkar) हे एक हिमनगाचे टोक आहे. त्यामुळे चौकशी जसजशी पुढे सरकेर तसतसे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दिंव्यंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे देऊन अनेकांना सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी अनधिकृत मदत करण्याचा प्रका राजरोसपणे सुरु आहे. धक्कादाय म्हणजे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात (Ahmednagar Civil Hospital) असा प्रकारचे एक रॅकेटच सक्रीय झाल्याची प्राथमिक माहिती असून, या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजते. या सहापैकी दोघे जण रुग्णालयातच काम करणारे कर्मचारी आहेत. या प्रकरणामुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कोणत्याही नोंदीशिवाय प्रमाणपत्र वाटप
पूजा खेडकर हिनेसुद्धा अहमदनगर जिल्हा रुग्णालयातूनच दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविले असल्याचे पुढे येत आहे. सदर रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना हाताला धरुन बनावट प्रमाणपत्रे दिली जात आहेत. या कर्मचाऱ्यांकरवी सदर उमेदवाराची कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता, रुग्णालयात नोंद न करता ऑनलाईन पोर्टलवर माहिती भगली जात आहे. या माहितीत्वारे बनावट पद्धतीने अपंग प्रमाणपत्र मिळवले जात असल्याचे पुढे आले आहे. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी (वर्ग एक) डॉ. साहेबराव डवरे यांनी याबात तक्रार दिली आहे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा नोंदविलेल्यांपैकी चार जण पाथर्डी तालुक्यातील आहेत. तर उर्वरीत दोघे रुग्णालयातीलच कर्मचारी असल्याचे समजते. (हेही वाचा, माजी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई, केंद्र सरकारने केले बडतर्फ)
फिर्यादी आणि गुन्हा दाखल झालेल्यांची नावे
फिर्यादी: डॉ. साहेबराव डवरे, वैद्यकीय अधिकारी (वर्ग एक), जिल्हा सरकारी रुग्णालय
गुन्हा दाखल संशयित आरोपींची नावे:
- प्रसाद संजय बडे (पाथर्डी)
- सुदर्शन शंकर बडे (पाथर्डी)
- सागर भानुदास केकाण (रा. पागोरी पिंपळगाव, पाथर्डी)
- गणेश रघुनाथ पाखरे (माणिकदौंडी, पाथर्डी)
- योगेश बनकर (जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी)
- गणेश गोत्राळ (जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी) (Puja Khedkar Case: 'पूजा खेडकरचे अपंगत्वाचे दावे खोटे, प्रमाणपत्रात बदलले नाव'; दिल्ली पोलिसांच्या स्टेटस रिपोर्टमध्ये व्यक्त केला संशय)
कसा झाला भांडोफोड?
जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र बोगस पद्धतीने दिले जात असल्याची, कुजबुज बऱ्याक काळापासून सुरु होती. त्यावरुन माहिती घेत सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे रितसर तक्रार केली होती. या तक्रारीत रुग्णालयातील काही कर्मचारीच बोगस प्रमाणपत्र वितरणामध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवाय, काही कर्मचाऱ्यांच्या थेट नावाचाच उल्लेख होता. त्यावरुन चौकशी केली असता दिव्यांग नोंदणी पोर्टलवर चार लाभार्थ्यांची नावे नोंद असल्याचे आढळले. मात्र, या चौघांची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी केल्याची कागदपत्रे उपलब्ध नव्हती. शिवाय दिव्यांग प्रमाणपत्र दिलेल्या दिवशी रजिस्टरलाही संबंधितांची नोंद नव्हती. विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडेही याबाबत तपासणी झाली नव्हती. तशी फाईलही त्यांच्याकडे आली नव्हती. परिणामी ही नोंद बोगस पद्धतीने झाली असल्याचे पुढे आले आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला.