State Cabinet Meeting Decision: पोलीस पाटील पगार, तालुका शहरांचे नामांतर; जाणून घ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीती निर्णय

भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करु शकतो. त्यामुळे संभाव्य आचार संहिता लागू होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आज (13 फेब्रुवारी) पार पडली.

CM Eknath Shinde | (Image Credits - Twitter)

State Cabinet Meeting Decision: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) तोंडावर आली आहे. भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करु शकतो. त्यामुळे संभाव्य आचार संहिता लागू होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आज (13 फेब्रुवारी) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. यामध्ये पोलीस पाटील पगार (Police Patil Salary) वाढ, वेल्हे तालुक्याचे राजगड असे नामांतर करण्याच्या निर्णयास मंजूली देण्यात आली. याशिवाय अहमदनरग जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे नामांतर करण्याच्या निर्णयासही मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाने इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेतले. हे निर्णय खालील प्रमाणे.

राज्यमंत्रिमंडळ निर्णय

एक्स पोस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि राज्य मंत्रिमंडळातील इतरही मंत्री उपस्थित होते.