Thane News: पासपोर्ट मागणीसाठी पोलिसांनी मागितली लाच, ठाण्यातील दोन पोलिसांना अटक
तर एकाने ५००० रुपयांची मागणी मागितली होती. दोघांना लाच स्वीकारताना लाचलूचपत विभागाने रंगे हात पकडले.
Thane News: दोन पोलिसांना लाच घेताना रंगे हात पकडल्याची माहिती समोर येत आहे. पासपोर्ट पडताळणीसाठी 6000 रुपयांची लाच मागितली होती. तर एकाने 5000 रुपयांची मागणी मागितली होती. दोघांना लाच स्वीकारताना लाचलूचपत विभागाने रंगे हात पकडले. निलेश शिंदे आणि साहेबराव जाधव अशी लाच स्वीकारणाऱ्या हवालदारांची नावे आहेत . दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई सुरु केली आहे. (हेही वाचा- तेलंगणाचा अधिकारी 84 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
मिळालेल्या माहितीनुसार, सर जे जे मार्ग पोलिस ठाण्यातील हवालदार निलेश शिंदे आणि साहेबराव जाधव यांनी लाच घेतली होती. लाच घेताना दोघे ही रंगे हात पकडले गेले. निलेश शिंदे यांनी पासपोर्ट पडताळनीसाठी आलेल्या एका व्यक्तीकडून 6000 रुपयांची मागणी केली होती. त्यांनी सांगितले की, काम लवकर होईल त्यासाठी 6000 रुपये द्यावे लागतील. तर दुसरे हवालदार साहेबराव जाधव यांनी एकाकडून 5000 रुपयांची मागणी केली होती.
या दोन्ही घटनांमुळे पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यात दिवशी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला आणि दोघांना रंगे हात पकडले. निलेश शिंदे आणि साहेबराव जाधव यांच्यावर लाच घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना कामातून निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.