Navi Mumbai Police Bharti: पोलीस भरती चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक

11 , नवी मुंबई कॅम्पच्या सशस्र पोलिस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता. शनिवारी बाळेगाव, वाकळण येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये मैदानी चाचणी सुरू होती.

Maharashtra Police Bharti | (File Image)

ठाण्यात पोलीस भरतीसाठी धावताना अमळनेरच्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर  पोलीस भरती मैदानी चाचणीदरम्यान सहा जणांची प्रकृती खालावली आहे.  अत्यवस्थ उमेदवारांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.  अक्षय बिहाडे या 25  वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. तर नवी मुंबई कॅम्पसाठी सुरू असलेल्या पोलिस भरतीदरम्यान शनिवारी झालेल्या मैदानी चाचणीत अत्यवस्थ झालेल्या सात उमेदवारांपैकी एका तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर आणखी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.  (हेही वाचा - Pune Police Issued Notice To Sambhaji Bhide: संभाजी भिडे यांना पुणे पोलिसांकडून नोटीस जारी; कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन)

पोलिस भरतीदरम्यान मृत झालेल्या तरुणाचे नाव अक्षय मिलींद बिहाडे (25) असे असून तो जळगाव येथील अंमळनेर येथे राहत होता. अक्षयने राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 11 , नवी मुंबई कॅम्पच्या सशस्र पोलिस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता. शनिवारी बाळेगाव, वाकळण येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये मैदानी चाचणी सुरू होती. पुरुष उमेदवारांमध्ये 5 किमी धावण्याची चाचणी सुरू असताना सात  उमेदवारांना चक्कर येऊन ते  खाली पडला.

अक्षयला हृदयविकाराचा झटका आला की त्याने काही सेवेन केले होते, याची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.  अक्षयच्या  मृत्यूमुळे मैदानावर धावाधाव करणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे.   त्याच्या  मृत्युचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता.