Aurangabad Bus Robbing Case: औरंगाबाद मध्ये खासगी प्रवासी बसवर दगडफेक करून लुटण्याच्या प्रयत्नात 2 जण अटकेत

हिंगोली येथील खुराणा ट्रॅव्हल्सची खाजगी बस पुण्यावरून वाळुज, छत्रपती संभाजीनगर मार्गे हिंगोलीकडे जात असताना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथे शनिवारी (29 जुलै) रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास आली असता अज्ञात चोरट्यानी ट्रॅव्हल्सवर दगडफेक करून हल्ला केला

Arrested | (File Image)

औरंगाबाद (Aurangabad) मध्ये  खासगी प्रवासी बसवर दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याच्या प्रयत्नात 2 जणांना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश मिळाले आहे.  काल पहाटेच्या सुमारास मुंबई तसंच पुण्याहून औरंगाबादमार्गे नागपूर तसंच हिंगोलीला जाणाऱ्या गाड्यांवर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सुदैवाने या दगडफेकीमध्ये कोणीही प्रवासी जखमी झालेला नाही. मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

हिंगोली येथील खुराणा ट्रॅव्हल्सची  खाजगी बस पुण्यावरून वाळुज, छत्रपती संभाजीनगर मार्गे हिंगोलीकडे जात असताना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथे शनिवारी (29 जुलै) रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास आली असता अज्ञात चोरट्यानी ट्रॅव्हल्सवर दगडफेक करून हल्ला केला. या हल्ल्यात बसची समोरची काच फूटली. बस मध्ये 30-40 जण प्रवास करत होते. त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

औरंगाबाद मध्ये खासगी प्रवासी बसवर दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याच्या प्रयत्नात 2 जण अटकेत वाळूज मधील जिकठाण मध्ये 2 बाईकस्वारांना लुटल्यानंतर खाजगी बस वर दगडफेक झाल्याने अशाप्रकारे दहशत निर्माण करण्याच्या घटनेने वाळूज सह सार्‍या जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement