PMPML Bus Driver Viral Video: मोबाईलवर सिनेमा पाहात चालवली बस; निगडी डेपोच्या पीएमपी ड्रायव्हरचा प्रताप
लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र, व्हिडिओत पाहायला मिळते की, रस्त्यावरुन बस चालवताना पीएमपीएमएल बस चालक (PMPML Bus Driver) हा चक्क मोबाईलवर सिनेमा पाहतो आहे.
Bus Driver Viral Video: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML ) निगडी बस डेपोतील (Nigdi Bus Depot) एका चालकाचा धक्कादायक व्हिडिओ पुढे आला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र, व्हिडिओत पाहायला मिळते की, रस्त्यावरुन बस चालवताना पीएमपीएमएल बस चालक (PMPML Bus Driver) हा चक्क मोबाईलवर सिनेमा पाहतो आहे. बसमधील प्रवाशांनी या चालकाचे व्हिडिओ चित्रिकरण केले. जे आता सोशल मीडियावरही व्हायरल (PMPML Bus Driver Viral Video) झाले आहे.
पीएमपीएमएल बस हे सार्वजनिक वाहन आहे. कमी वाहतूक दर आणि अत्यंत सुरक्षीत असे मानल्या जाणाऱ्या या वाहनातून सर्वसामान्य नागरिक प्रवास करत असतात. बसमध्ये आसनक्षमता मर्यादीत असली तरी अनेकदा क्षमतेपेक्षा अधिकही लोक बसमधून प्रावस करतात. या सर्व प्रवाशांची सुरक्षा चालकाच्या हाती असते. चालकाने वाहन निट हाकले तर बसमधील प्रवासी सुरक्षीत राहतात. अन्यथा मोठा धोका संभवतो. या व्हिडिओत तेच दिसत आहे. एक चालक बस चालवताना चक्क मोबाईलवर सिनेमा पाहात आहे. सिनेमा पाहताना त्याचे लक्ष विचलीत झाले असते तर मोठा अनर्थ घडला असता.
मोबाईलवर सिनेमा पाहणाऱ्या चालकाचे नाव समोर आले नाही. मात्र, निष्काळजीपणे वाहन हाकून नागरिकांचे प्राण धोक्यात घातल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थापकांनीही सदर चालकावर चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. (हेही वाचा, PMPAL Bus Viral Video: पुण्यात पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाशाने 'ड्रायव्हर माझे अपहरण करत आहे' म्हणत घातला गोंधळ; काय आहे नेमकी प्रकरण? पहा व्हिडिओ)
व्हिडिओ
दरम्यान, केवळ पीएमपीएमएल बसचालकच नव्हे तर खासगी वाहनातील चालकांकडूनही अनेकदा अशा चुका घडतात. चारचाकी चालकांकडून मोबाईलवर सिनेमे पाहणे, कानात हेडफोन लावून फोनवर बोलणे, गाणी ऐकणे, पान, मावा, गुठखा, तंबाखू मळणे/खाणे असे एकाहून एक अनेक आक्षेपार्ह वर्तन केले जाते. रस्त्यावरील दुचाकीस्वारांकडूनही असेच वर्तन होताना आढळते. वाहतुक पोलिसांकडून अशा मंडळींवर कारवाईसुद्धा केली जाते. परंतू, सरकार, पोलीस, प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्याकडून अवाहन करुनही, अशा घटना घडताना दिसतात.