IPL Auction 2025 Live

PMPL Bus Service: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार

22 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पीएमपीएलचा रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे. तब्बल पाच महिन्यानंतर पीएमपीएल बस सेवा सुरू झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

PMPL Bus (PC- Wikimedia Commons)

PMPL Bus Service: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. 22 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पीएमपीएलचा रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे. तब्बल पाच महिन्यानंतर पीएमपीएल बस सेवा (PMPL Bus Service) सुरू झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली होती. यास अजित पवार यांनी मान्यता दिली. त्यामुळे पुण्यात पीएमपीएल बस सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (हेही वाचा - Ganeshotsav 2020 Special Train: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या विशेष ट्रेन्सला चाकरमान्यांचा अल्प प्रतिसाद)

याशिवाय पीएमपीएल प्रशासनाने पुढील आठवड्यात शहरात बस सेवा सुरु होईल, असं स्पष्ट केलं आहे. परंतु, पीएमपीएल प्रशासनाकडून कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यात पीएमपीएलला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. याशिवाय पीएमपीएल बस सेवा सुरू नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पुढील दोन दिवसांत पुणे व चिंचवड मनपा आयुक्त आणि पीएमपीएल प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत बस सेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात साधारणत: 400 ते 450 बसेस सुरू करण्यात येणार आहेत. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.