PM Narendra Modi 'लाडक्या बहिणींच्या' भेटीसाठी 5 ऑक्टोबरला ठाण्यात; Mukhyamantri Ladki Bahin Yojana कार्यक्रमात पहिल्यांदाच होणार थेट सहभागी
त्यामुळे आता पीएम मोदी या योजनेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत काय बोलणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
PM Narendra Modi Maharashtra Visit On Oct 5: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांचे बिगुल आता येत्या काही दिवसांमध्ये वाजण्याची चर्चा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा महाराष्ट्र दौरा जाहीर झाला आहे. 5 ऑक्टोबरला मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. यावेळी पीएम मोदी विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासोबतच ठाण्यामध्ये खास 'लाडक्या बहिणींना' भेटणार आहेत.महिला सक्षमीकरण अभियानाच्या 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) मध्ये त्यांचा हा पहिलाच थेट सहभाग असणार आहे. 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना'ही सीएम एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी असताना त्यामध्ये पहिल्यांदाच मोदींचा सहभाग असणार आहे. त्यामुळे या दृष्टीने ठाण्यात आता तयारीला सुरूवात झाली आहे.
ठाण्यामध्ये कासारवडवली येथील वालावलकर मैदानावर हा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.या अनुषंगाने ठाण्यामध्ये वाहतूक व्यवस्थेमध्येही काही बदल करण्यात आले आहेत.
काय आहे 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना'?
'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना' मध्ये सरकार कडून महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याला 1500 रूपये दिले जातात. 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असणार्यांना ही आर्थिक मदत दिली जात आहे. Majhi Ladki Bahin Yojana Status: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची स्थिती तपासा; पैसे मिळणार की नाही? घ्या जाणून .
'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना' ही आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 'चुनावी जुमला' असल्याची टीका विरोधकांकडून होत असताना मुख्यमंत्र्यांनी ही योजना कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता पीएम मोदी या योजनेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत काय बोलणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीच चढाओढ होत असल्याचं काही दिवसांपूर्वी दिसलं होतं.
5 ऑक्टोबरच्या मोदींच्या महाराष्ट्र दौर्यामध्ये मेट्रो 3 चं उद्द्घाटन होणार आहे.तसेच ते नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ट्रायल लॅन्डिंग च्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.