PM Modi Mumbai Visit: मुंबई विद्यापीठ कँम्पसची भींत तोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पार्किंग, विद्यार्थी आक्रमक

मुंबईतील विविध प्रकल्पांचे उद्गाटन आणि नव्या प्रकल्पांची पायाभरणी ते करतील. बीकेसी मैदानावर सायंकाळच्या सुमारास त्यांची एक सभाही होणार आहे. दरम्यान, या सभेसाठी मुंबई विद्यापाठीच्या कलिना (Kalina Campus of Mumbai University)आवाराची भींत तोडण्यात आल्याचा आरोप होत आहे.

Mumbai University | (Photo Credits: mu.ac.in)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर (PM Narendra Modi Mumbai Visit) आहेत. मुंबईतील विविध प्रकल्पांचे उद्गाटन आणि नव्या प्रकल्पांची पायाभरणी ते करतील. बीकेसी मैदानावर सायंकाळच्या सुमारास त्यांची एक सभाही होणार आहे. दरम्यान, या सभेसाठी मुंबई विद्यापाठीच्या कलिना (Kalina Campus of Mumbai University)आवाराची भींत तोडण्यात आली आहे. ही भींत तोडल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. शैक्षणिक वर्तुळातूनही संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय कार्यक्रमासाठी विद्यापीठाची भींत किती वेळा तोडली जणार? असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेला होणारी गर्दी विचारात घोता पार्किंगची सुविधाही मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक प्रमाणावर पार्किंग उपलब्ध करुन देण्यासाठी ही भींत तोडल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, ही भींत पुन्हा उभारली जाणार असल्याचेही प्रशाननाने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनेही जोरदार तयारी केली आहे. मात्र, राजकीय कार्यक्रमासाठी विद्यापीठाची भींत तोडल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. राजकीय कार्यक्रमासाठी विद्यापीठीची भींत तोडण्याची गरजच काय? असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत. विशेषत: विद्यार्थी संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. (हेही वाचा, PM Modi Mumbai Visit Traffic Advisory: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल, अनेक निर्बंध)

दरम्यान, मुंबईतील सुमारे 38 हजार कोटींच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून चौख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या पहिल्या मुंबई दौऱ्यात पंतप्रधान मोदी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) प्रदर्शन मैदानावर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांना संबोधित करतील. या सभेत ते काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे.

PM मोदी सुमारे 12,600 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो रेल्वे लाईन्स 2A आणि 7 वर झेंडा दाखवतील. दहिसर पूर्व आणि डीएन नगर (Yellow Line) यांना जोडणारी मेट्रो लाईन 2A सुमारे 18.6 किमी लांब आहे, तर अंधेरी ई - दहिसर ई (Red Line) यांना जोडणारी मेट्रो लाईन 7 सुमारे 16.5 किमी लांब आहे. या लाईनची पायाभरणीही 2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी केली होती. बेलापूर आणि खारघरच्या सेंट्रल पार्क स्थानकांना जोडणाऱ्या नवी मुंबई मेट्रोच्या 5.96 किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif