भाजपचे 'वाघ' म्हणतात, 'पंतप्रधान मोदी विष्णूचा 11 वा अवतार'

नरेंद्र मोदी हे विष्णूचा ११ वा अवतार असल्याचे भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटले आहे. काही वेळापूर्वी त्यांनी असे ट्वीट केले आहे.

अवधूत वाघ आणि नरेंद्र मोदी (Photo Credit : Facebook)

नरेंद्र मोदी हे विष्णूचा 11 वा अवतार असल्याचे भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटले आहे. काही वेळापूर्वी त्यांनी असे ट्वीट केले आहे. हिंदू संस्कृतीत 33 कोटी देव असून पंचमहाभुतं आहेत. भारतमातेला आपण देवता मानतो. त्याचप्रमाणे देशाचे प्रधानसेवक नरेंद्र मोदी हे भारतमातेची सेवा करतात. म्हणूनच ते आमच्यासाठी देवासारखे असल्याचे वाघ यांनी म्हटले आहे. याच भावनेपोटी त्यांनी नरेंद्र मोदींना विष्णूचा 11 वा अवतार असल्याचे म्हटलं आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रभू रामचंद्राने, कृष्णाने जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतला होता. तसेच नरेंद्र मोदी आमच्यासाठी देवच आहेत. सगळ्यांसाठी चांगलं काम करणाऱ्या मोदींना आम्ही देवच मानतो आणि त्यात काहीही गैर नसल्याचे वाघांनी म्हटले आहे.

आम्हाला मोदी भक्त म्हटलं जात अंध भक्त नाही. त्यामुळेच मी जे काही बोललो ते त्या माझ्या मनातील भावनेपोटीच, असे स्पष्टीकरणही वाघ यांनी दिले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

आधी 74 वर्षीय व्यावसायिकाला प्रेमात पाडलं, हनीट्रॅप करून उकळले 18 लाख रुपये! नंतर बलात्काराच्या प्रकरणात गुंतवून तुरुंगात टाकलं

MPSC Exams In Marathi: राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा! आता मराठीमध्ये होणार एमपीएससीच्या परीक्षा, CM Devendra Fadnavis यांची घोषणा

Award Winner Farmer Dies by Suicide: युवा शेतकरी पुरस्कार विजेता कैलास नागरे यांची आत्महत्या; विषारी औषध प्राशन करून संपवले जीवन

Advertisement

Shimga Festival 2025 Significance: महाराष्ट्रात आज शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा! कोकणातील शिमगा महोत्सवाचे महत्त्व, पूजाविधा जाणून घ्या

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement