PM Modi's Third Swearing-in To Celebrate In US: अमेरिकेमधील 22 शहरांमध्ये साजरा होणार नरेंद्र मोदींचा तिसरा विजय; OFBJP-USA कडून आयोजन

मोदींचा तिसरा शपथविधी सोहळा न्यूयॉर्क, जर्सी सिटी, वॉशिंग्टन, बोस्टन, टँपा, अटलांटा, ह्यूस्टन, डॅलस, शिकागो, लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को अशा अमेरिकेतील 22 शहरांमध्ये साजरा केला जाईल.

PM Modi | Twitter

PM Modi's Third Swearing-in To Celebrate In US: नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आपल्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा भाजप आणि एनडीएला विजय मिळवून दिला. त्यानंतर आता उद्या, 9 जून रोजी ते तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. याआधी 1962 मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर, पंतप्रधान मोदी हे दुसरे पंतप्रधान असतील जे, दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सलग तिसऱ्यांदा पुन्हा हे पद भूषवणार आहेत. दिल्लील मोदींच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे. दुसरीकडे अमेरिकेमध्येही हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.

ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी (OFBJP-USA) च्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, नरेंद्र मोदी यांचे समर्थक त्यांचा तिसरा शपथविधी सोहळा साजरा करतील. मोदींचा तिसरा शपथविधी सोहळा न्यूयॉर्क, जर्सी सिटी, वॉशिंग्टन, बोस्टन, टँपा, अटलांटा, ह्यूस्टन, डॅलस, शिकागो, लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को अशा अमेरिकेतील 22 शहरांमध्ये साजरा केला जाईल. कालच्या शुक्रवारपासून ते पुढील रविवारपर्यंत अमेरिकेमध्ये मोदींचा विजय साजरा होणार आहे.

ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे अध्यक्ष अडापा प्रसाद यांनी सांगितले, भारतीय जनता पक्ष (भाजप) हा लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे. आता मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. भारतात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी-अमेरिका हे भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने काम करेल. आम्ही भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी भारतीय डायस्पोरा एकत्र करू. (हेही वाचा: नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभाचे निमंत्रण 'INDIA' आघाडीला मिळाले नाही, काँग्रेस म्हणाली- निमंत्रण दिल्यास विचार करू)

परदेशी भारतीयांशी संबंधित सर्व समस्यांसाठी ते पंतप्रधानांना अनिवासी भारतीय (एनआरआय) आयोग स्थापन करण्याची विनंती करणार आहेत. प्रसाद म्हणाले की, ‘मोठ्या संख्येने परदेशात राहणाऱ्या भारतीयांना मालमत्तेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये अगदी बँकेच्या स्वाक्षरी जुळण्यासारख्या छोट्या समस्यांनाही तोंड द्यावे लागते. म्हणूनच आम्ही केंद्र सरकारकडे एनआरआय आयोग स्थापन करण्याची मागणी करत आहोत, जे या समस्यांचे निराकरण करेल.’