PM-Kisan Samman Nidhi: पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना अंतर्गत 16,621 कोटी रुपये 8.31 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा; तुम्हाला मिळाले पैसे?

हे 6,000 रुपये 4 महिन्यांच्या फरकाने टप्प्या टप्याने दिले जातात. शेतकऱ्यांना प्रति टप्पा 2 हजार या प्रमाणात ही रक्कम वर्षभर दिली जाते.

PM-Kisan Samman Nidhi | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) कालावधीत देशभरातील बळीराजाला केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी योजना (Shetkari Sanman Yojana) अंतर्गत मोठा दिलासा दिला. शेतकरी सन्मान निधी (PM-Kisan Samman Nidhi) योजनेत देण्यात येणारी रक्कम केंद्र सरकारने नियोजित वेळेच्या काही आठवडे आधिच दिली आहे. त्यासाठी केंद्राने देशभरातील सुमारे 8.31 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,621 कोटी रुपयांची रक्कम पाठवली आहे. या रखमेतून लाभार्थी असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला 2,000 रुपयांचा हाप्ता दिला जाणार आहे.

शेतकरी सन्मान योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला प्रतिवर्ष एकूण 6000 रुपये दिले जातात. हे 6,000 रुपये 4 महिन्यांच्या फरकाने टप्प्या टप्याने दिले जातात. शेतकऱ्यांना प्रति टप्पा 2 हजार या प्रमाणात ही रक्कम वर्षभर दिली जाते. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, 24 मार्च पासून देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊन काळात केंद्राने आतापर्यंत 1,674 कोटी रुपये 83.77 शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली आहे. ज्यात पाठीमागील वर्षाच्या रकमेचाही समावेश आहे. याशिवाय 14,945 कोटी रुपये 7.47 कोटी शेतकऱ्यांना नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या हप्त्याच्या रुपात दिले आहेत. (हेही वाचा, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना: घरबसल्या पाहा तुम्हाला मिळणार का 6,000 रुपये?)

शेतकरी सन्मान निधी योजनेतील पहिला हप्ता नव्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार होता. मात्र, लॉकडाऊन स्थिती विचारात घेऊन केंद्र सरकारने पहिल्या पंधरवड्यातच ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच नागरिकांना मोफत रेशन देण्याच्या घोषणेसोबत केंद्राने 3,985 टन डाळही वितरीत केली आहे. पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत सरकारने महिलांच्या जनधन बचत खात्यात 3 महिन्यांपर्यंत 500 रुपये वळते करण्याचा तसेच उज्ज्वला योजना लाभार्थी महिलांना जूनपर्यंत मोफत सिलिंडर देण्याचीही घोषणा सरकारने केली आहे.