मुंबई: हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, मध्य रेल्वे वाहतुकीवरही परिणाम; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे प्रशासनानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल दरम्यान असलेल्या हार्बर रेल्वे (Panvel-CSMT Harbour line ) मार्गावरील वाहतूक तांत्रिक कारणामुळे विस्कळीत झाली आहे. शिवडी (Sewri Railway Station) ते कॉटन ग्रीन रेलवे स्टेशन ( Cotton Green Railway Station) दरम्यान, निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचे सांगितले जात आहे. मध्य रेल्वे प्रशासनानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे वृत्त आहे. या बिघाडाचा कल्याण, कर्जत, कसारा आदी लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्याचे समजते.
मध्य रेल्वे ट्विट
nbsp;
दरम्यान, मुंबई आणि उपनगरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होणे हे आता नित्याचेच झाले आहे. गेल्याच आठवड्यात सलग पाच दिवस मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर हार्बर मार्गावरीलही वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तर आता ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळच्या वेळी लोकल विस्कळीत झाल्याने पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.